व्होडाफोन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली असून कंपनी आपल्या ग्राहकांना पाच प्रीपेड रिचार्जवर 5GB पर्यंत अतिरिक्त डेटा अगदी मोफत देत आहे. कंपनीची ही ऑफर सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध असेल.

149 रुपये, 219 रुपये, 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर ही ऑफर आहे.  याशिवाय, व्होडाफोन 49 रुपये आणि 79 रुपयांच्या ऑलराउंडर पॅक्सवरही अतिरिक्त डेटाचा फायदा देत आहे. कंपनीच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना व्होडाफोन अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे रिचार्ज करावे लागेल.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

या ऑफरअंतर्गत दरमहिना 2 जीबी डेटा देणाऱ्या 149 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी डेटा मोफत मिळतोय. म्हणजे या प्लॅनमध्ये युजर्सना आता 28 दिवसात एकूण 3GB डेटाचा वापर करता येईल. तर, 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा मिळतो, पण आता ऑफरनुसार यामध्ये 2 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजे 28 दिवसांसाठी एकूण 30 जीबी डेटा मिळेल. तर, दररोज 1.5 जीबी डेटा देणाऱ्या 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या तिन्ही प्लॅनमध्ये 5 जीबी अतिरिक्त डेटा दिला जातोय. या तिन्ही प्लॅन्सची वैधता अनुक्रमे 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांची आहे. या सर्व प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि व्होडाफोन प्ले व Zee5 अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळतं .

दोन ऑलराउंडर प्लॅनवर किती फायदा?
कंपनी 49 रुपये आणि 79 रुपयांच्या ऑलराउंडर प्लॅनवरही 300 MB अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. दोन्ही प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये आधीपासूनच 38 रुपये टॉकटाइम आणि 100 MB डेटा मिळतो. तर, 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये 64 रुपये टॉकटाइम आणि 200 MB डेटा मिळतो. यामध्ये आता अतिरिक्त 300 MB डेटा मिळेल.