07 March 2021

News Flash

#RoadSafetyWeek : ९० टक्के लोक सीट बेल्टचा वापर न करता जीव घालतात धोक्यात

३४ टक्के मुंबईकरांना मागील आसनांवरील सीटबेल्ट कसाबांधवा हेच माहित नाही

नुकतेच निस्‍सान इंडिया व सेव्‍हलाइफ फाऊंडेशन यांनी सादर केलेल्या ‘भारतातील मागील आसनांवरील सीटबेल्ट वापर आणि चाइल्‍ड रोड सेफ्टी’ मधील अहवालाने एक चिंताजनक बाबसमोर आणली. ती म्‍हणजे  भारतीय लोक आपल्‍या व आपल्‍या मुलांच्‍या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. दिल्‍ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, कोलकाता आणि लखनऊ
याप्रमुख शहरांमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या निरीक्षणात्‍मक सर्वेक्षणामधून ही बाब निश्चित झाली. या सर्वेक्षणातून निदर्शनास आले ९० टक्‍क्‍यांहून अधिक प्रतिसादकांनी मागील आसनांवरील सीटबेल्टचा वापर करत नसल्‍याचे सांगितले, ज्‍यामुळे ते आपणहून आपला जीव धोक्‍यात टाकतात. दिल्‍ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, कोलकाता आणि लखनऊ या प्रमुख शहरांमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या निरीक्षणात्‍मक सर्वेक्षणामधून ही बाब निश्चित झाली. या सर्वेक्षणातून निदर्शनास आले की, ९८ टक्‍के प्रतिसादक मागील आसनांवरील सीट-बेल्‍टचा वापर करत नाहीत. ७० टक्‍क्‍यांहूनअधिक लोकांना मागील आसनांवरील सीट-बेल्‍ट्स वापरण्‍याचे महत्‍त्‍व माहित असताना देखील मागील आसनांवरील सीट बेल्‍ट्सचा वापर खूपच कमी आहे. नुकतेच या अहवालाचे अनावरण रस्ते वाहतूक आणि महामार्गांचे माननीय केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.मुंबईमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात चारचाकी वापरणाऱ्यांपैकी ३४ टक्के मुंबईकरांना मागील आसनांवरील सीटबेल्ट कसा बांधावा हेच माहित नसल्याचे निदर्शनास आले आहे.
चारचाकी वापरकर्त्यांची जागरुकता, वागणूक, वृत्ती आणि सवयी,  सीट बेल्टचा वापर किंवा वापर नकरणे या बाबी जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण मुंबईत करण्यात आले. त्यामध्ये २०३ व्यक्तींनी सहभाग नोंदविला. तर मागील आसनांवरील सीट बेल्ट बांधणे बंधनकारक करणाऱ्या कडक कायदयाची गरज असल्याचे मत यावेळी ९०% व्यक्तींनी नोंदविले आहे.

भारतात मुलांसाठी सुरक्षित रस्त्यांबाबत सर्वजणच दक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील सीटवर मुले असतील तर चारचाकी वाहन चालविताना अधिक काळजी घेतली जाते का ? या मुद्यावर सर्वांनीच होकार दर्शविला आहे. मागील सीटवर बसल्यांनंतर सीटबेल्ट बांधण्या मध्ये मुंबईतील मुलांचे प्रमाण सर्वाधिक (१६ टक्के ) आहे. परंतु, रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित वाहनचाल विण्यावर मार्गदर्शन करणाऱ्या एकही कार्यशाळेत सहभाग घेतला नसल्याचे ११ शहरांपैकी ७ शहरातील ६२ % व्यक्तींनी मत व्यक्त केले आहे. ही धक्कादायक बाब सुद्धा या सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे.

शाळेतून घरी येता जाता प्रवास सुरक्षित वाटत असल्याचेही ५४.५% मुलांनी सांगितले आहे. पण बहुतांबाशी मुलांनी सुरक्षित वाटते कि नाही याबाबदल काहीच स्पष्ट केलेले नाही. रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्यां वाहन चालकांची संख्या मुंबईत सार्वधिक (५०टक्केपेक्षा जास्त ) दिसून आली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अन्य शहरांपेक्षा मुंबईने आघाडी घेतल्याचे सर्वेक्षणातदिसून आले आहे. या अभ्‍यासाने मुलांच्‍या प्रवासा दरम्‍यानच्‍या सुरक्षिततेवर देखीलप्रकाश टाकला.

या अभ्‍यासातून निदर्शनास आले की, दोन तृतीयांश प्रतिसादकांना वाटते की, भारतीय रस्‍ते मुलांसाठी सुरक्षित नाहीत. तसेच अहवालाने निदर्शनास आणले की, ९२.८ टक्‍के प्रतिसादकांना चाइल्‍ड हेल्‍मेट्सचे सुरक्षितता विषयकफायदे माहित असताना देखील फक्‍त २०.१ टक्‍के प्रतिसादकांकडे चाइल्‍ड हेल्‍मेट होते. ही बाब रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) नुकतेच सादर केलेल्‍या माहितीशी समान आहे. या माहितीच्‍या मते वर्ष २०१७ मध्‍ये रस्‍त्‍यांवरील अपघातांमुळे ९,४०८ मुलांचा मृत्‍यू झाला. याचा अर्थ प्रत्‍येक दिवशी भारतीय रस्‍त्‍यांवर जवळपास २६ मुलांचा मृत्‍यू होतो.

या निष्‍पत्‍तींसोबतच अहवाल व्‍यापक राष्‍ट्रीय रस्‍ता सुरक्षाकायदा किंवा धोरण-अंमलबजावणी मधील पोकळी दूरकरण्‍यासाठी मोटार वाहन दुरुस्ती विधेयकाचा कायदा बनवण्‍यासोबतच वाहतुकीच्‍या नियमांच्‍या पालनासाठी कडक अंमलबजावणी यंत्रणा राबवण्‍याची बाजू मांडतो. अहवालाच्‍या निष्‍पत्‍तींमध्‍ये उत्‍तम धोरण जागरूकता व अंमलबजावणी यादोन्‍ही गरजांचा उल्‍लेख दिसून येतो. फक्‍त २७.७ टक्‍के प्रतिसादकांना माहित होते की, भारतातील सध्‍याच्‍या कायद्यानुसार रिअर सीटबेल्‍टचा वापर अनिवार्य आहे. तसेच ९१.४ टक्‍के प्रतिसादकांनी भारतात कठोर चाइल्‍ड रोड सेफ्टी कायदा बनवण्‍याचा उल्‍लेख केला.
निस्‍सान इंडिया व सेव्‍ह लाइफ फाऊंडेशनसाठी संशोधन कंपनी एमडीआरएने केलेल्‍या ‘भारतातील मागील आसनांवरील सीटबेल्‍ट वापर आणि चाइल्‍ड रोड सेफ्टी’ अभ्‍यासामध्‍ये ११ भारतीय शहरांचा समावेश आहे. सीबीएसई स्‍कूल बस मार्गदर्शक तत्‍त्‍वांचे पालन करण्‍यासोबतच मागील आसनांवरील सीट बेल्‍ट्सचा वापर करण्‍यासाठी या अभ्‍यासामध्‍ये समोरासमोर मुलाखत घेतलेल्‍या ६,३०६ व्‍यक्‍तींचे प्रतिसाद, १०० सखोल तज्‍ज्ञ मुलाखती, दोन केंद्रित गट चर्चा आणि ऑन-साइट निरीक्षणांची नोंदणी आहे.
अहवालाच्‍या सादरी करणाप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्‍हणाले,’भारतात पायाभूत सुविधांची झपाट्याने वाढ होत असताना रस्‍ता सुरक्षेला महत्‍त्‍व देणे महत्‍त्‍वाचे बनले आहे. धोरण व जागरूकता निर्माण उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सरकारने रस्‍ता सुरक्षिततेला महत्‍त्‍व दिले आहे. मी हा उपक्रम आणि रस्‍ता सुरक्षेला लोकांचे आंदोलन बनवण्‍यासाठी सहयोगाने काम करणाऱ्या  कॉर्पोरेट भारतीय व समाजातील नागरिकांचे कौतुक करतो.”
अहवालाच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना निस्‍सान इंडियाचे अध्‍यक्ष थॉमस कुहल म्‍हणाले,”भारतात रस्‍ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी विविध उपक्रम हाती घेण्‍यातआले आहेत. पण मागील आसनांवरील सीट बेल्‍ट्सच्‍या
महत्‍त्‍वाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्‍यात आले आहे. निस्‍सान मध्‍ये आम्‍ही लोकांचे जीवन संपन्‍न करण्‍याचा प्रयत्‍न करतो. आम्‍हीया उपक्रमाच्‍या माध्‍यमातून मागील आसनांवरील सीट बेल्‍ट्सच्‍या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो. सेव्‍ह लाइफ फाऊंडेशन व शार्पसोबतचा आमचाधोरणात्‍मक सहयोग या महत्‍त्‍वपूर्ण मुद्दयावर लक्ष वेधून घेण्‍यामध्‍ये सहाय्यभूत ठरेल. आमच्‍या मोहिमेच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये १२ शहरांमधील २४० शाळांमधील २ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचत त्‍यांना मागील आसनांवरील सीट बेल्‍ट्सचा वापर आणि रस्‍ता सुरक्षेबाबत जागरूक करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 4:39 pm

Web Title: 90 percent people dont know how to wear seat belt
Next Stories
1 Blog: राजसाब, जरा अपने गिरेबान में झांक कर देखो…
2 BLOG : भाजपची हार हीच मनसेची जीत!
3 सावधान ! महाराष्ट्रात ‘पत्थलगडी’ ? आदिवासींची दिशाभूल
Just Now!
X