आघाडीच्या ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी MG Motors भारतीय बाजारात आपली नवीन फुल साइज एसयूव्ही MG Gloster लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनीने MG Gloster एसयूव्हीचा एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये कंपनीने या नवीन एसयूव्हीच्या फीचर्सबाबत माहिती दिलीये. नवीन MG Gloster मध्ये कंपनीने ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट फीचर दिलं आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीची टक्कर टोयोटाच्या फॉर्च्युनरसोबत असेल.

ऑटो पार्क असिस्ट :-
MG Motors ने फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये या एसयुव्हीची झलक दाखवली होती. आता कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या एसयूव्हीचा एक फोटोही जारी केला आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असलेली ही एसयूव्ही नोव्हेंबरमध्ये दिवाळीत भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनीने अनेक दर्जेदार आणि अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. ही एसयूव्ही कमी जागेमध्येही आपोआप स्वतःच पार्क होते. यासाठी ड्रायव्हरने स्टीअरिंगला हात लावण्याचीही गरज पडत नाही. हे फीचर सक्रिय करण्यासाठी केवळ एक बटण दाबण्याची आवश्यकता असेल. यानंतर गाडीतील सेन्सर किती जागा आहे ते बघून गाडी पार्क करु शकतात. या सेगमेंटमध्ये अशाप्रकारचं जबरदस्त फीचर पहिल्यांदाच आलं आहे.

पाहा व्हिडिओ :-

पहिली ऑटोनॉमस (Level 1) प्रीमियम एसयुव्ही :-
नवीन MG Gloster देशातील पहिली ऑटोनॉमस (Level 1) प्रीमियम एसयुव्ही असेल असा दावा कंपनीने केला आहे. एमजी मोटर्स नेहमीच अनोख्या फीचर्ससह आपल्या गाड्या बाजारात सादर करत असते. यापूर्वी कंपनीने भारतातील आपली पहिली गाडी MG Hector देखील देशातील पहिली इंटरनेट कार म्हणून लाँच केली होती. यात व्हॉइस कमांडर फीचरचा समावेश होता. याशिवाय कंपनीने दोन महिन्यांपूर्वीच MG Hector Plus ही एसयूव्ही देखील लाँच केली आहे. हेक्टर प्लस भारतातील पहिली 6आसनी इंटरनेट एसयूव्ही असून ती पॅनोरमिक सनरूफसह येते, असा कंपनीचा दावा आहे.

(टोयोटाच्या ‘इनोव्हा’ला देणार तगडी टक्कर, लाँच झाली शानदार MG Hector Plus)