भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानसोबत तब्बल चार लाख रुपयांचे ‘लाइफ इन्शुरन्स कव्हर’ देणार आहे. एअरटेलच्या 18 ते 54 या वयोगटातील कोणताही ग्राहक या जीवन विमा सुविधेचा लाभ घेऊ शकतो, असे कंपनीने म्हटले आहे. यासाठी एअरटेलने भारती अ‍ॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीशी भागीदारी केलीये.

आणखी वाचा- 39 रुपयांचा ‘ऑल राउंडर प्लान’, Vodafone ने आणला नवा पॅक

विशेष म्हणजे यासाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, किंवा वैद्यकिय तपासणी करण्याची आवश्यकता नसेल. ग्राहकांकडे इन्शुरन्सची हार्ड कॉपी घरी मागवण्याचा पर्यायही असेल. सध्या तरी एअरटेल कंपनीने 599 रुपयांचा हा प्लान दिल्ली क्षेत्रात लाँच केला आहे. पण, लवकरच हे लाइफ इन्शुरन्स कव्हर देशभरात लागू केले जाईल असे कंपनीने म्हटले आहे. या 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानसोबत कंपनी ग्राहकांना दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा पुरविणार आहे. या प्लानमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल्स, दररोज 100 एसएमएस वापरायला मिळतील. 84 दिवस इतकी या प्लानची वैधता असेल.