News Flash

Airtel : 48 आणि 98 रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन, मिळणार 6GB पर्यंत डेटा

28 दिवसांच्या वैधतेसह मिळणार तब्बल 6 जीबी डेटा

टेलिकॉम ऑपरेटर कंपनी Airtel ने दोन नवे डेटा प्लॅन लाँच केले आहेत. हे दोन्ही प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. 48 रुपये आणि 98 रुपयांचे हे दोन प्लॅन आहेत. कंपनीकडून अद्याप अधिकृत संकेतस्थळावर या प्लॅनबाबत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र हे प्लॅन सर्व थर्ड पार्टी अॅप्सवर उपलब्ध आहेत. तेथून ग्राहकांना याचा वापर करता येईल. ग्राहकांना केवळ डेटा पुरवण्याच्या दृष्टीकोनातून हे दोन्ही प्लॅन एअरटेलने लाँच केले असून याद्वारे जिओसमोर आव्हान उभं करण्याचा एअरटेलचा प्रयत्न आहे.

जाणून घेऊया नवे प्लॅन –
एअरटेल आपल्या 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3G किंवा 4G डेटा ग्राहकांना पुरवणार आहे. तर, 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 6GB डेटा मिळेल. 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 10 SMS पाठवता येतील. याशिवाय एअरटेलकडून 29 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 520MB डेटा ग्राहकांना वापरायला मिळतो.

48 आणि 98 रुपयांचा प्लॅन लाँच करण्याआधी कंपनीने पहिल्यांदाच एअरटेलचं कनेक्शन घेणाऱ्यांसाठी (फर्स्ट टाइम युजर) 248 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. 248 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.4 जीबी डेटा, अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधताही 28 दिवसांची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 11:22 am

Web Title: airtel announces rs 48 rs 98 prepaid data plans
Next Stories
1 32MP सुपर सेल्फी कॅमेरा, Redmi Y3 चा आज पहिला सेल; मिळणार 1120 GB डेटा
2 मोठी स्क्रीन आणि पावरफुल बॅटरी, Samsung Galaxy M30 चा आज सेल
3 ‘गुगल’चा पुढाकार! ऑफिसमधील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीसाठी नवी वेबसाइट
Just Now!
X