24 January 2021

News Flash

दररोज 1.5GB डेटासह फ्री मिळेल Zee5 प्रीमियम सबस्क्रिप्शन, Airtel ने आणला शानदार प्लॅन

Airtel च्या युजर्ससाठी आला शानदार प्लॅन...

टेलिकॉम कंपनी एअरटेलने 289 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटासोबतच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. यासोबतच 28 दिवसांची वैधता असलेल्या या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना Zee5 प्रीमियमचा मोफत अ‍ॅक्सेसही मिळणार आहे.

289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह कंपनीने 79 रुपयांचं टॉप-अप व्हाउचरही आणलं आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी Zee5 प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. सामान्यतः Zee5 च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी दरमहिन्याला 99 रुपये मोजावे लागतात. ग्राहकांना 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा आणि 100 एसएमएसची सेवा मिळेल. या प्लॅनमध्ये Zee5 प्रीमियमसोबत Airtel Xstream प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि Wynk म्यूजिकचा अ‍ॅक्सेसही ग्राहकांना मिळेल.

वर्ष 2018 मध्ये एअरटेलने पहिल्यांदा 289 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला होता. त्यावेळी या प्लॅनमध्ये 48 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटा आणि अनलिमिटेड व्हाॉइस कॉलिंगची सेवा मिळत होती. नंतर या प्लॅनची वैधता 84 दिवस करण्यात आली, पण नंतर कंपनीने हा प्लॅन बंद केला. त्यानंतर आता कंपनीने हा प्लॅन पुन्हा एकदा आणला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 1:52 pm

Web Title: airtel brings new rs 289 prepaid plan with free zee5 subscription sas 89
Next Stories
1 Suzuki Gixxer बाइक्स झाल्या महाग, कंपनीने केली किंमतीत वाढ
2 गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवले 11 धोकादायक Apps, तुम्हीही तातडीने करा डिलिट
3 बॅन केलेल्या ५९ चिनी Apps ची ७० प्रश्नांची सरकारी परीक्षा, तीन आठवड्यांची मुदत
Just Now!
X