News Flash

Airtel ने लाँच केला 148 रुपयांचा नवा प्लान, जाणून घ्या आकर्षक फायदे

विशेष म्हणजे या प्लानमध्ये ग्राहकांना Airtel TV आणि विंक म्यूझिक या लोकप्रिय अॅप्लिकेशनचं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल

पोस्टपेड प्लानमध्ये अनेक बदल केल्यानंतर टेलिकॉम कंपनी एअरटेलने पुन्हा एकदा आपल्या प्री-पेड ग्राहकांवर लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. प्री-पेड ग्राहकांसाठी एअरटेलने 148 रुपयांचा नवा प्लान सादर केला आहे.

एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित  लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा मिळेल. तसंच 3 जीबी डेटा देखील वापरता येणार आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस देखील ग्राहकांना पाठवता येतील. विशेष म्हणजे या प्लानमध्ये ग्राहकांना Airtel TV आणि विंक म्यूझिक या लोकप्रिय अॅप्लिकेशनचं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

148 रुपयांचा प्री-पेड रीचार्ज प्लान सध्या केवळ आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये हा प्लान देशातील अन्य सर्कलमध्येही उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच एअरटेलने आपल्या 365 दिवस वैधता असलेला प्री-पेड प्लान अपडेट केला असून यामध्ये आधीपेक्षा अधिक डेटा वापरायला मिळत आहे.  1699 रुपयांच्या या प्लानमध्ये आता ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटाऐवजी 1.4 जीबी डेटा मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 2:19 pm

Web Title: airtel launches 148 rs prepaid plan sas 89
Next Stories
1 Renault ची नवीन Duster भारतात लाँच, किंमत 7.99 लाख रुपये
2 OnePlus 7 चं नवं व्हेरिअंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
3 संध्याकाळी ७ ते रात्री १० दरम्यान रडल्याने वजन कमी होते
Just Now!
X