25 September 2020

News Flash

Airtel ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर फ्री मिळेल 6GB पर्यंत डेटा

Airtel ने आणली नवीन 'फ्री डेटा कूपन्स' ऑफर

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या युजर्सना 6GB पर्यंत मोफत डेटा देत आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ‘फ्री डेटा कूपन्स’ ऑफर आणली आहे. पण या ऑफरसाठी ग्राहकांना एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे रिचार्ज करणं आवश्यक आहे.

एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे 219 किंवा त्यापेक्षा जास्त प्लॅनसाठी रिचार्ज करणाऱ्यांना या 6GB पर्यत अतिरिक्त फ्री डेटा ऑफरचा लाभ घेता येईल. मात्र ही ऑफर काही प्री-सिलेक्टेड युजर्ससाठी उपलब्ध असेल असे कंपनीच्या वेबसाइटवर म्हटले आहे. ऑफरनुसार एअरटेल युजर्सना 6GB पर्यंत इंटरनेट डेटा मोफत मिळेल. डेटा कूपन्सद्वारे हा डेटा युजर्सना 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. युजर्स My Airtel अ‍ॅपमध्ये ‘My Coupons’ सेक्शनवर जाऊन कूपन क्लेम करु शकतात.

एअरटेल युजर्सना 219 , 249, 279, 298, 349 किंवा 398 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 1GB डेटाचे दोन कूपन मिळतील. म्हणजे या पॅकमध्ये 2GB फ्री डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल. तर, 399 रुपये, 449 आणि 558 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर युजर्सना 1GB डेटाचे चार कूपन मिळतील. याची व्हॅलिडिटी 56 दिवस असेल. अशाचप्रकारे 598 आणि 698 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 84 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटाचे सहा कूपन्स म्हणजेच 6GB डेटा युजर्सना वापरण्यास मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 8:29 am

Web Title: airtel launches free coupons for prepaid customers offers complimentary data up to 6gb on recharge sas 89
Next Stories
1 केसांच्या सौंदर्यापासून ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत सोयाबीन खाण्याचे १० फायदे
2 कोबी खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे माहित आहे का?
3 फक्त दोन मिनिटांत 1.5 लाखांहून जास्त विक्री, रिअलमीच्या ‘स्वस्त’ फोनला जबरदस्त प्रतिसाद
Just Now!
X