स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन ऑफर आणत असते. आता एका नव्या सेवेनुसार कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सना 2जीबीपर्यंत मोफत डेटा देत आहे. यासाठी एअरटेलने खाद्य पदार्थ बनवणाऱ्या PepsiCo (पेप्सीको) सोबत भागीदारी केली आहे. ऑफरनुसार पेप्सीकोचे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्यांना एका कूपन कोडद्वारे 2जीबीपर्यंत मोफत डेटा मिळणार आहे.

कूपन कोड मिळणार :-
या ऑफरनुसार 1 सप्टेंबर म्हणजे आजपासून कुरकुरे, अंकल चिप्स, Lay’s किंवा डॉरिटोजच्या खरेदीवर 2 जीबीपर्यंत फ्री 4G  डेटा मिळेल.  म्हणजे पेपिस्को प्रोडक्टच्या सर्व  पॅकसोबत ग्राहकांना एक कूपन कोड मिळेल. एअरटेल प्रीपेड ग्राहक या कोडचा वापर जास्तीत जास्त तीन वेळेस करु शकतात. एका मोबाइल नंबरवर या ऑफरचा फायदा तीन वेळेस घेता येईल, तिन्ही वेळेस वेगवेगळा कोड असणं आवश्यक आहे. हा 12 अंकांचा Airtel Promo कोड पॅकेटाच्या आतमध्ये लिहिलेला असेल. कोड मिळाल्यानंतर युजर्स Airtel Thanks अ‍ॅपद्वारे My Coupons सेक्शनमध्ये जाऊन त्याचा वापर करु शकतात. पण प्रत्येक कोडवर वेगवेगळ्या अमाउंटचा फ्री डेटा ग्राहकांना मिळेल. पॅकेटाच्या किंमतीवर तो अवलंबून असेल. ही ऑफर 31 जानेवारी 2021 पर्यंत वैध असणार आहे. ऑफरअंतर्गत मिळणारा फ्री डेटा तीन दिवसांसाठी असेल.

How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
Employer killed owner for non-payment of wages
ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

10-20 रुपयांच्या पॅकेटवर फ्री डेटा :- 
हा कोड ग्राहकांना चार प्रकारचे प्रोडक्ट- Lays चिप्स, Doritos, कुरकुरे आणि अंकल चिप्ससोबत मिळेल. 10 रुपये आणि 20 रुपयांच्या पॅकेटमध्येही हा कोड मिळेल.  10 रुपयांचं पॅकेट खरेदी केल्यास कंपनीकडून 1जीबी आणि 20 रुपयांच्या पॅकेटवर 2जीबी डेटा दिला जात आहे.