29 November 2020

News Flash

11 हजार रुपयांत बुक करा नवी Maruti Ertiga, 21 नोव्हेंबरला होणार लाँच

केवळ 11 हजार रुपयांमध्ये या कारसाठी नोंदणी करता येणार

प्रसीद्ध कार निर्माती कंपनी Maruti Suzuki भारतीय बाजारात 21 नोव्हेंबर रोजी आपल्या नव्या Ertiga एमपीव्हीचं(मल्टी पर्पज व्हेइकल) नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. मारुती सुझुकी एरेना डिलरशीप नेटवर्कद्वारेच या कारची विक्री होणार आहे, 11 हजार रुपयांमध्ये या कारसाठी नोंदणी करता येणार आहे.

पेट्रोल(1.5 लिटर) आणि डिझेल(1.3 लिटर) अशा दोन्ही व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1,500cc चं इंजिन असण्याची शक्यता आहे. याद्वारे 105hp पावर आणि 138Nm पिक टॉर्क जनरेट होईल. नव्या Ertiga ची 4,395mm इतकी लांबी, 1,735mm रुंदी आणि 1,690mm उंची असेल, तर 2,740mm व्हिल बेस असणार आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये ड्युअल-बॅटरी सेटअप असेल. तर डिझेल व्हेरिअंटमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच सिंगल बॅटरी सेटअप असणार आहे.

ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, ऑक्सफोर्ड ब्ल्यू , आर्कटिक व्हाइट आणि सिल्की सिल्वर अशा पाच रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल. Ertiga चं हे नवं मॉडेल कंपनीच्या सर्व डिलर्सकडे उपलब्ध झाल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलचं उत्पादन पूर्णतः थांबवण्यात येणार आहे. नवं मॉडेल लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेलचं नाव बदललं जाईल अशी शक्यता आधी वर्तवली जात होती, मात्र नवं मॉडेल लाँच झाल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलचं उत्पादन पूर्णतः थांबवण्यात येणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये Ertiga चं सध्या बाजारात असलेलं मॉडेल लाँच केलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये या मॉडेलचं मिड-सायकल अपडेट आणलं होतं. 2012 मध्ये लाँचिंग झाल्यापासून आतापर्यंत कंपनीने जवळपास 4.2 लाख युनिट्सची विक्री केली आहे. सध्याचं मॉडेल 1.4-लिटर पेट्रोल आणि 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2018 5:44 pm

Web Title: all new maruti suzuki ertiga booking started
Next Stories
1 जाणून घ्या लहान मुलांशी पैशाबाबत चर्चा करणं कधी सुरू करावं?
2 Apple iPad Pro (2018) साठी आगाऊ नोंदणी सुरू, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
3 फॉर्च्युनरला टक्कर देणार महिंद्राची नवी SUV, जाणून घ्या सर्वकाही
Just Now!
X