07 August 2020

News Flash

बदाम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हणूनही ओळखले जाते

बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. यामध्ये केवळ पोषणमूल्ये आणि जीवनसत्त्वेच नसतात तर त्यामुळे पदार्थाला स्वाद येण्यासही उपयोग होतो. गोड पदार्थांमध्ये बदाम खूपच छान लागतात. बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हणूनही ओळखले जाते. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, बदामात असतात. स्मृतिभ्रंश, विस्मरण या आजारांसाठी बदाम उपयुक्त आहे. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास बदामाची मदत होते.

बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. धकाधकीच्या जीवनात अनेकांना रक्तदाबाची समस्या निर्माण होते. अशा व्यक्तींनी दररोज भिजवलेले बदाम खावेत. भिजवलेल्या बदामामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’नुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बदलती जीवनशैली आणि फास्टफूड खाण्याची सवय यामुळे अनेक जण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी भजवलेले बदाम खावेत. बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचनशक्ती सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 3:16 pm

Web Title: almonds health benefits and side effects nck 90
Next Stories
1 JioMart अ‍ॅप झालं लाँच, शॉपिंगवर मिळेल डिस्काउंट व फ्री होम डिलिव्हरी
2 पाठदुखीनं त्रस्त आहात? आजच बदला ‘या’ सवयी
3 एकाच नंबरवरुन अनेक डिव्हाइसवर वापरता येणार WhatsApp, लवकरच रोलआउट होणार नवं फीचर
Just Now!
X