अ‍ॅमेझॉनवर लवकरच या मौसमातील तिसरा सेल सोमावारपासून सुरु झाला आहे. दिवळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा खास सेल २५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रीक गॅजेट्स, कपडे, घरगुती वापराच्या वस्तू आणि इतर अनेक गोष्टींवर घसघशीत सूट देण्यात आली आहे.

तरुणाईला लक्षात घेत अफोर्टेबल गॅजेट्सची मोठी रेंज या सेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात अ‍ॅमेझॉनवर ५०० रुपयांच्या आत उपलब्ध असणाऱ्या १५ स्वस्तात मस्त गॅजेट्सबद्दल…

१)
सोनी एमडीआर-झेडएक्स ११० ऐ हेडफोन्स
(Sony MDR-ZX110A headphones without mic)

या हेडफोन्सवर ८९१ रुपयांची सूट देण्यात आल्याने ते ४९९ रुपयांना विकत घेता येतील.

२)
सिसका पॉवर पोर्ट १०० (१० हजार एमएएच) पॉवर बँक
(Syska power Port100 10000mAh power bank)

या पॉवर बँकची खरी किंमत १ हजार ५९९ रुपये आहे. मात्र सेलनिमित्त या पॉवर बँकवर अकराशे रुपयांची सूट आहे. १० हजार एमएएच क्षमतेची ही पॉवर बँक अवघ्या ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.

३)
प्रोटॉनिक्स प्रो-१३० आय ट्रॅक ट्रॅकर
(Portronics POR-130 iTrack tracker)

हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी उपयोगात येणाऱ्या या ट्रॅकरची किंमत ६९९ रुपये असून यावर साडेतीनशे रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्रॅकर ३४९ रुपयांना उपलब्ध आहे.

४)
आयबॉल किबोर्ड आणि माऊस कॉम्बो
(iBall keyboard and mouse combo)

आयबॉल किबोर्ड आणि माऊसची एकत्रित किंमत ८९९ रुपये आहे. मात्र दिवाळी सेल निमित्त यावर ४०० रुपयांची सूट देण्यात आल्याने तो ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.

५)
अ‍ॅमेझॉन बेसिक्स ड्युएल युएसबी कार चार्जर
(AmazonBasics Dual USB car charger)

८२६ रुपयांचा हा कार चार्जर सेलनिमित्त ४४९ रुपयांना उपलब्ध आहे

६)
आयबॉल मुसीप्ले ए वन वायरलेस अल्ट्रा पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकर्स
(iBall MusiPlay A1 wireless ultra-portable Bluetooth speakers)

सामान्यपणे ९९९ रुपयांना उपलब्ध असणाऱ्या या स्पिकर्सवर ५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सेल दरम्यान हे स्पिकर्स ४९९ रुपयांना खरेदी करता येतील.

७)
एचपी युएसबी ३.१ फ्लॅश ड्राइव्ह ३२ जीबी ७९६ एल
(HP USB 3.1 Flash Drive 32GB 796L)

२ हजार २०० रुपये किंमत असणारा एचपीचा हा प्लॅश ड्राइव्ह अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान केवळ ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. २.० युएसबीपेक्षा दहा पटींने वेगवान असणाऱ्या या प्लॅश ड्राइव्हवर १ हजार ७०१ रुपयांची सूट आहे.

८)
स्कलकॅण्डी जेआयबी एसटूडीयूडीझेड-००३ इन इयर हेडफोन्स
(Skullcandy JIB S2DUDZ-003 in-ear headphones)

मूळ किंमत ७९९ रुपये असणाऱ्या या हेडफोन्सवर ३०० रुपयांची सूट आहे. काळ्या, निळ्या, पांढऱ्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगामध्ये हे हेडफोन्स उपलब्ध आहेत.

९)
झेब्रॉनिक्स एस ९९० स्पिकर्स
(Zebronics S990 speakers)

९९९ रुपये किंमत असणाऱ्या या स्पिकर्सवर ५०० रुपयांची सूट असून ते ४९९ रुपयांना उपलब्ध आहेत.

१०)
आयबॉल नॅनो इयरवेअर टी ९ व्ही ३.० बीटी वायरलेस इन इयर हेडसेट विथ माईक
(iBall Nano Earwear T9 V3.0 BT wireless in-ear headset with mic)

मूळ किंमत १ हजार २९५ रुपये असणाऱ्या या वायरलेस इयरबड्सवर ७९६ रुपयांची सूट आहे. त्यामुळे हे ४९९ रुपयांना उपलब्ध आहेत. एकदा चार्ज केल्यावर हे हेडफोन्स ५ तास चालतात. तर दोन तास चार्ज केल्यावर हे हेडफोन्स ९० तास काम करतात असं कंपनीचं म्हणणं आहे.

११)
एमआय इयरफोन्स
(Mi earphones)

एमआयच्या इयरफोन्सवर २०० रुपयांची सूट असून ते ३९९ रुपयांना उपलब्ध आहेत.

१२)
जेबीएल सी ५० एचआय इन इयर हेडफोन्स विथ माईक
(JBL C50HI in-ear headphones with mic)

मूळ किंमत ९९९ रुपये असणाऱ्या या इयरफोनवर ६०० रुपयांची सूट असल्याने हे इयरफोन्स ३९९ रुपयांना उपलब्ध आहेत. हे इयरफोन्स निळ्या, काळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगामध्ये उपलब्ध आहेत. या इयरफोनवरील माईकचे बटण दाबून ठेवल्यास गुगुल असिस्टंट सुरु होतो.

१३)
एचपी ३२ जीबी क्लास १० मायक्रोएसडी मेमेरी कार्ड
(HP 32GB Class 10 microSD memory card)

९९९ रुपये किंमत असणाऱ्या या मेमरी कार्डवर ५७४ रुपयांची सूट आहे. त्यामुळे हे मेमरी कार्ड ४२५ रुपयांना उपलब्ध आहे.

१४)
एक्समॅट मेटेल प्रो थ्री इन वन केबल
(Xmate Mettle Pro 3-in-1 cable)

७०० रुपये मूळ किंमत असणाऱ्या या केबलवर सेलदरम्यान ३५१ रुपयांची म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक सूट देण्यात आली आहे. ही केबर ३४९ रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये टाइप सी, मायक्रो युएसबी आणि लाइटींग केबल पोर्टचा समावेश आहे.

१५)
लॅपगार्ड एलजी ५१४ १० हजार ४०० एमएएच पॉवर बँक
(Lapguard LG514 10400mAh power bank)

२३०० रुपये मूळ किंमत असणाऱ्या या पॉवर बँकवर चक्क १ हजार ८०० रुपयांची सूट आहे. तीन युएसबी पोर्ट असणारी ही पॉवर बँक केवळ ४९९ रुपयांना उपलब्ध आहे.