20 February 2019

News Flash

Amazon Great Indian Festival : नवरात्रीच्या निमित्ताने मोबाईल खरेदीवर ‘या’ ऑफर्स

१० ऑक्टोबरपासून सुरु होणारा हा सेल १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु असेल. यामध्ये मोबाईलची किंमत कमी करण्यापासून ते कॅशबॅक ऑफर मिळण्यापर्यंत अनेक डिस्काउंटस देण्यात आली आहेत.

ऑनलाईन खरेदीचे प्रस्थ सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एका क्लिकवर खरेदी उपलब्ध झाल्याने सध्या ग्राहक अगदी कुठूनही आपल्याला हव्या त्या वस्तूंची खरेदी करतात. ग्राहकांची हीच मानसिकता लक्षात घेऊन ऑनलाईन शॉपिंग कंपन्याही वेगवेगळ्या निमित्ताने ग्राहकांना विविध ऑफर्स देतात. यामध्येही अॅमेझॉन आघाडीवर असल्याचे दिसते. आता नवरात्र आणि दिवाळी अगदी तोंडावर आलेले असताना अॅमेझॉनने आपला Amazon Great Indian Festival सेल जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना मोबाईलच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर खास सूट देण्यात येणार आहे. १० ऑक्टोबरपासून सुरु होणारा हा सेल १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु असेल. यामध्ये मोबाईलची किंमत कमी करण्यापासून ते कॅशबॅक ऑफर मिळण्यापर्यंत अनेक डिस्काऊंटस देण्यात आली आहेत.

iphone X च्या ६४ जीबी व्हेरिएंटवर २१,९०१ रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन ६९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. याबरोबरच यावर एक्सचेंज ऑफरमध्ये आणखीही सूट मिळू शकते. iPhone 8 Plus, iPhone 8, iPhone 7, iPhone 7 Plus, iPhone 6S आणि iPhone 6 यावरही सूट मिळणार असल्याचे अॅमेझॉनकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय सर्व डिल्सवर मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफरही देण्यात आली आहे. OnePlus 6 या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या फोनवर ५ हजारांची सूट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन २९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय फायर टीव्ही स्टीक, किंडल ई रिडर यांसारख्या गोष्टींवरही बरेच डिस्काऊंट देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy S9 या ६४ जीबीच्या फोनवर जवळपास २० हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन ४२,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर Vivo V9 Pro या ६४ जीबीच्या फोनवर २ हजारांची सूट असल्याने हा फोन १७,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. खरेदीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड वापरल्यास १० टक्के जास्तीचे डिस्काऊंट मिळणार आहे. तर ६ हजार रुपयांहून अधिक किमतीची खरेदी केल्यास अॅमेझॉनकडून १० टक्के जास्तीची कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सणावारांच्या निमित्ताने मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी आहे. ही ऑफर केवळ प्राईम मेंबर्ससाठी असेल असेही कंपनीने जाहीर केले आहे.

First Published on October 9, 2018 2:38 pm

Web Title: amazon great indian festival sale for prime members know best deals and offers on smartphone