प्यूजो मोटरसायकलने (Peugeot Motorcycles) दोन दिवसांपूर्वी मेट्रोपोलिस मॅक्सी स्कूटर (Metropolis Maxi Scooter) फ्रान्सच्या पॅरिसमध्ये लाँच केली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर या स्कूटरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्यूजो मोटरसायकल Mahindra Rise (महिंद्रा राइज) ची एक कंपनी आहे.

कशी आहे मेट्रोपोलिस मॅक्सी स्कूटर, आणि स्पर्धा कोणाशी ?
मेट्रोपोलिस एक तीन चाकांची मॅक्सी स्कूटर असून या स्कूटरचा लूक बराच वेगळा आणि आकर्षक आहे. मेट्रोपोलिस मॅक्सी स्कूटरमध्ये कंपनीने 339cc फोर-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन 35 hp पॉवर आणि 38 Nm टॉर्क निर्माण करतं. मेट्रोपोलिसमध्ये 12 इंचाचे व्हील्स असून जवळपास 256 किलोग्रॅम इतकं या स्कूटरचं वजन आहे. जागतिक बाजारात तीन चाकांच्या स्कूटरचं मार्केट लहान आहे, पण यामध्ये स्पर्धा देखील जास्त आहे. प्यूजो मोटरसायकलने गेल्या काही काळापासून या सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. कंपनीने ही स्कूटर ‘यामहा ट्रायसिटी 300’ ला (Yamaha Tricity 300) टक्कर देण्यासाठी आणली आहे.

भारतात लॉचिंग कधी ?
भारतात Metropolis Maxi Scooter कधीपर्यंत लाँच होईल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण आनंद महिंद्रा या स्कूटरबाबत चांगलेच उत्सुक आहेत. आनंद महिंद्रांनी या स्कूटरबाबत माहिती देताना, “सिंहाची गर्जना…प्यूजो मोटरसायकलद्वारे काल पॅरिसमध्ये नवीन प्यूजो मेट्रोपोलिस लाँच करण्यात आली…ही महिंद्रा राइजची एक कंपनी आहे…” असं ट्विट केलं आहे. आनंद महिंद्रांच्या या ट्विटनंतर ही स्कूटर भारतातही लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


फ्रान्समध्ये आहे कंपनीचा प्रकल्प? :
प्यूजो मोटरसायकलचा मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प फ्रान्समध्ये आहे. प्यूजो मोटरसायकल आता महिंद्रा राइजअंतर्गत आपल्या प्रोडक्ट्स पोर्टफोलियोचा विस्तार करण्यावर विचार करत आहे.