News Flash

भारतात ‘स्वस्त’ iPhone ची विक्री कधीपासून? रजिस्ट्रेशनला झाली सुरूवात

गेल्या महिन्यात Apple कंपनीने आपला ‘स्वस्त’ iPhone SE 2020 लॉन्च केला...

गेल्या महिन्यात Apple कंपनीने आपला ‘स्वस्त’ iPhone SE 2020 लॉन्च केला. कमी किंमतीमुळे चर्चेत असलेला हा फोन लॉन्च करतेवेळी कंपनीने तो भारतात कधी उपलब्ध होईल आणि त्याची विक्री कधीपासून सुरू होईल याबाबत माहिती दिली नव्हती. पण आता या आयफोनबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

इ-कॉमर्स कंपनी Flipkart च्या संकेतस्थळावर iPhone SE 2020 च्या विक्रीबाबत माहिती उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टने आपल्या वेबसाइवर जारी केलेल्या एका बॅनरमुळे iPhone SE 2020 ची भारतात लवकरच विक्री सुरू होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘कमिंग सून’ अशा बॅनरखाली हा फोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच फ्लिपकार्टने फोन खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांचे रजिस्ट्रेशनही सुरू केले आहे. भारतात विक्री नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार याबाबत अद्याप अॅपल कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, फ्लिपकार्टने Notify Me हे पेज सुरू केल्यामुळे iPhone SE ची लवकरच भारतात विक्री सुरू होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

iPhone SE 2020 हा सर्वात स्वस्त iPhone असल्याचा दावा कंपनीनं केला असला तरी त्याची सुरूवातीची किंमत 64 जीबीच्या व्हेरिअंटसाठी 42 हजार 500 रूपये आहे. कंपनीनं हा फोन 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध केला आहे. सध्या अन्य व्हेरिअंटच्या भारतातील किंमतीबाबत मात्र कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. F/1.8 सह 12 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओही शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 7 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध असेल. iPhone SE 2020 मध्ये 4.7 इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या मोबाइलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये टच आयडी बटणही आहे. iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. फोनची संपूर्ण बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अ‍ॅल्युमिनिअमपासून बनली आहे. तसंच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगसह केवळ अर्ध्या तासात हा फोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 2:34 pm

Web Title: apple iphone se 2020 sale to start soon as flipkart teaser goes live sas 89
Next Stories
1 Airtel चे तीन स्वस्त प्लॅन लॉन्च, 1GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे
2 48MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची दमदार बॅटरी, Oppo A92 झाला लॉन्च
3 Video: आता Handwritten Notes थेट कंप्युटरवर करता येणार Copy Paste
Just Now!
X