28 January 2020

News Flash

27 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ लोकप्रिय फोन

लवकरच ही किंमत अन्य इ-कॉमर्स संकेतस्थळांवरही अपडेट होणार

Apple ने कॅलिफोर्नियातील एका खास इव्हेंटमध्ये मंगळवारी(दि.10) बहुप्रतिक्षित iphone 11 सीरिजचे तीन फोन लाँच केले. कंपनीने iphone 11, iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max हे फोन लाँच केले आहेत. नवीन आयफोन लाँच केल्यानंतर कंपनी त्यांच्या जुन्या आयफोनच्या किंमतीत कपात करत असते. त्यानुसार गेल्या वर्षी लाँच झालेल्या iPhone XR च्या किंमतीत कपात झाली आहे.

iphone 11 सीरिज लाँच होईपर्यंत अॅपलच्या संकेतस्थळावर iPhone XR (बेसिक व्हेरिअंट) 76 हजार 900 रुपयांना लिस्टेड होता. पण, आता कंपनीच्या या फोनच्या किंमतीत 27 हजार रुपयांची कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा आयफोन आता 49 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. लवकरच ही किंमत इतर इ-कॉमर्स संकेतस्थळांवरही अपडेट होईल.

तर, एक दिवसापूर्वीच लाँच झालेला नवा iphone भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. भारतात iphone 11 च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 64,900 रूपये, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 99,900 रूपये आणि iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रूपये असणार आहे.

First Published on September 11, 2019 2:56 pm

Web Title: apple iphone xr price drop after effect of iphone 11 sas 89
Next Stories
1 नवीन ई-स्कूटर लाँच, एकदा चार्ज केल्यावर 90 किमीचं मायलेज
2 कायमस्वरूपी पदांसाठी मुंबई मेट्रोमध्ये बंपर भरती
3 मागील बाजूला चार कॅमेरे ; Realme 5 Proचा खास सेल
Just Now!
X