अनेकांना आयफोनची क्रेझ असते. परंतु अधिक किंमतीमुळे ते घेणं बरेचदा शक्य होत नाही. परंतु सध्या कंपनीनं iPhone XR च्या मॉडेलवर १६ टक्क्यांची सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे फोन नवे नसून रिफर्बिश मॉडेल्स आहेत. सध्या केवळ अमेरिकेत याची विक्री सुरू करण्यात आली असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ही विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे कोणताही फेक प्रोडक्ट मिळण्याची शक्यता नाही.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार iPhone XR च्या ६४ जीबीच्या मॉडेलची किंमत ४९९ डॉलर्स म्हणजेच ३८ हजार रूपयांच्या जवळपास आहे. तर १२८ जीबीच्या मॉडेलची किंमत ५३९ डॉलर्स म्हणजेच ४१ हजार रूपयांच्या जवळपास आणि २५६ जीबीच्या मॉडेलची किंमत ६२९ डॉलर्स म्हणजेच ४८ हजार रुपयांच्या जवळपास ठेवण्यात आली आहे. नव्या फोनच्या तुलनेत १२० डॉलर्सपेक्षा कमी ही किंमत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, हे फोन रिफर्बिश असले तरी त्यावर ग्राहकांना एका वर्षांची वॉरंटी देण्यात आहे. तसंच AppleCare+ वर जाऊन ही वॉरंटी वाढवतादेखील येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग किंवा अन्य कोणत्या कारणामुळे परत करण्यात आलेले फोन पुन्हा नीट करून रिफर्बिश म्हणून विकण्यात येतात. कंपनीद्वारे ते मोबाईल पुन्हा रिपेअर करून नव्याप्रमाणे केले जातात. नव्यानं या मोबाईलचं परीक्षण करून नव्या बॉक्समध्ये हे फोन पॅक करण्यात आले आहेत. तसंच यात सर्व प्रकारच्या अॅक्सेसरीजही देण्यात आल्या असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.