गेल्या महिन्यातच दिग्गज कंपनी अॅपलने आपले नवे आयफोन सादर केले. पण, कंपनीने लॉन्च केलेल्या iPhone XS आणि XS Max या दोन नव्या आयफोनकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. भारतातून या दोन्ही फोनसाठी अत्यल्प मागणी असल्याचं समोर येत आहे. तुलनेने आयफोन XS ची मागणी बऱ्यापैकी आहे. विकेंड सेलमध्ये निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री झाली असून, इतकी कमी विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं भारतातील अनेक विक्रेत्यांनी सांगितलं.

देशात अॅपल प्रीमियम रिसेलरचे जवळपास 1500 स्टोअर्स आहेत, मात्र या स्टोअर्समध्ये नव्या आयफोनचा 40 ते 50 टक्के स्टॉक तसाच पडून आहे. याउलट गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन X ची मागणी अधिक आहे. आतापर्यंत आयफोन XS आणि XS मॅक्सच्या केवळ 50 ते 60 टक्के मॉडेल्सची विक्री झाली आहे. आकडेवारीचा विचार करता गेल्या वर्षी अवघ्या तीन दिवसांमध्येच आयफोन X ची विक्री 50 ते 60 टक्के झाली होती, सणासुदीचा काळ सुरू झाल्यानंतर आयफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. 99 हजार ते 1 लाख 44 हजाराच्या दरम्यान या दोन्ही नव्या आयफोनची किंमत आहे.

आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्स –

गोल्ड, सिलव्हर आणि स्पाईसी ग्रे या तीन रंगात उपलब्द
आयओएस – १२ प्रोसेसर
५१२ जीबीचे स्टोअरेज
ड्यूअल सिम
वाटरप्रूफ (दोन मीटर पाण्यात ३० मिनीटांमपर्यंत राहिल्यास काही होणार नाही)
आयफोन एक्सएस ५.८ इंच सुपर रेटिना ओलेड(OLED) डिस्प्लेसह
आयफोन एक्सएस मॅक्सचा स्क्रीन ६.५ इंच सुपर रेटिना ओलेड(OLED) डिस्प्ले
आयफोन एक्सएस मॅक्सला ३डी टच
ए-१२ बायॉनिक हा अधिक वेगवान प्रोसेसर
OIS सेन्सर्स
Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो.
समोरील कॅमेरा सात मेगापिक्सल असेल.
ड्युल रियर कॅमेराचा ड्युल रियर कॅमेरा, यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार
फेस आयडी या फिचरमुळे चेहऱ्याच्या आधारे फोन अनलॉक केला जाऊ शकणार आहे.