Bajaj Auto ने आपली Discover ही बाइक अधिकृत संकेतस्थळावरुन हटवली आहे. त्यामुळे कंपनीने ही बाइक बंद केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत कंपनीच्या संकेतस्थळावर Discover रेंजमधील Discover 110 आणि Discover 125 या दोन बाइक उपलब्ध होत्या. पण, या दोन्ही बाइक म्हणजेच पूर्ण Discover सेगमेंटला आता कंपनीच्या संकेतस्थळावरुन हटवण्यात आलंय.

कंपनीने आपल्या बहुतांश गाड्या एक एप्रिलपासून लागू झालेल्या बीएस-6 इंजिन मानकांप्रमाणे यापूर्वीच अपडेट केल्या आहेत. पण, Discover रेंजमधील बाइक्स अद्याप कंपनीने बीएस-6 इंजिनमध्ये अपडेट केल्या नव्हत्या. आता Discover हे सेगमेंटच अधिकृत संकेतस्थळावरुन हटवण्यात आलं आहे. तसंच ही बाइक बीएस-6 इंजिनमध्ये अपडेट करण्याबाबतही अद्याप कंपनीने काही घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही बाइक कंपनीने बंद केल्याची चर्चा आहे. मात्र, Bajaj Auto कडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Reliance Industries quarterly profit stays flat
रिलायन्सला ६९,६२१ कोटींचा विक्रमी वार्षिक नफा; उलाढालीत १० लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच कंपनी
infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

Bajaj Discover ही बाइक कंपनीने 2003 मध्ये म्हणजे 17 वर्षांपूर्वी लॉन्च केली होती. लॉन्च झाल्यापासून ही बाइक कंपनीने विविध इंजिन प्रकारात आणली. सुरूवातीला 125सीसी क्षमतेची डिस्कवर आली होती. त्यानंतर ही बाइक 100सीसी, 135सीसी आणि 150सीसी प्रकारातही लाँच झाली होती. नंतर दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये अन्य सर्व व्हेरिअंट कंपनीने बंद केले. परिणामी केवळ डिस्कवर 110 आणि डिस्कवर 125 या दोनच प्रकारात ही बाइक उपलब्ध होती. पण नंतर या बाइकची लोकप्रियता कमी झाली. मागणी घटल्यामुळेच कंपनीने ही बाइक अद्याप बीएस-६ इंजिनमध्ये लाँन्च न करता बंद करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.