Bajaj Auto च्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पल्सर श्रेणीमध्ये अजून एक बाइक दाखल झालीये. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित बाइक Pulsar 125 Neon लाँच केली आहे. ही बाइक कंपनीने ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच केली आहे.

कंपनीच्या पल्सर श्रेणीतील 125 Neon ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक आहे. शानदार परफॉर्मन्स आणि आकर्षक स्टाइलसह कमी किंमतीत स्पोर्टी मोटरसायकल खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांचा विचार करुन पल्सर 125 Neon बाजारात उतरवण्यात आल्याचं बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

इंजिन –
नव्या पल्सरमध्ये 125cc क्षमतेचं DTS-i इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 8,500 rpm वर 11.8 bhp ची ऊर्जा आणि 6,500 rpm वर 11 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. 5-स्पीड गिअरबॉक्स असलेल्या या बाइकचं वजन 140 किलोग्राम आहे.

ब्रेकिंग आणि सस्पेंशन –
पल्सर 125 Neon च्या ड्रम ब्रेक व्हेरिअंटमध्ये पुढील बाजूला 170 mm ड्रम ब्रेक आणि मागील बाजूला 130 mm ड्रम ब्रेक आहे. तर, डिस्क व्हेरिअंटमध्ये पुढील बाजूला 240 mm डिस्क ब्रेक आहे. सस्पेंशनबाबत सांगायचं झाल्यास, बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूला ट्विन गॅस शॉक अॅब्जॉर्बर्स दिलेत. नियॉन ब्ल्यू (मॅट ब्लॅक बॉडीवर), सोलर रेड आणि प्लॅटिनम सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये ही बाइक लाँच करण्यात आली आहे.

किंमत –
या बाइकच्या ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत 64 हजार रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत 66 हजार 618 रुपये आहे. दिल्ली एक्स-शोरुममधील या किंमती आहेत.