दिवसाची सुरुवात असो किंवा कोणतंही शारीरिक, मानसिक काम केल्यानंतर आलेला थकवा असो एक कप कडकडीत चहा प्यायला की सगळी मरळ दूर होते आणिहोऊन मस्त तरतरी येते. त्यामुळे चहा हे अनेकांच्या आवडतं पेय आहे. पूर्वी चहा हा अत्यंत साध्या पद्धतीने केला जात होता. मात्र, आता या चहामध्ये सुद्धा नवनवीन फ्लेवर मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे गृहिणी साधाच चहा हटके पद्धतीने तयार करत त्याला एक नवीन चव देतात. त्यामुळेच साध्या चहापेक्षा मसाला चहा, आल्याचा चहा, गवतीचहा, ब्लॅक टी, लेमन टी असे अनेक चहा लोकप्रिय होत आहे. परंतु यासोबतच लवंगांचा चहा सुद्धा सध्या लोकप्रिय होत असून तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे लवंगांचा चहा कसा करायाच आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. श्रमाची काम केल्यामुळे किंवा आजारपणामुळे अंग दुखत असल्यास लवंगांच्या चहामुळे थकवा दूर होतो व आराम मिळतो.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

२. अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दूर होतो व अन्नपचन व्यवस्थित होते

३. दातदुखी दूर होते.

४. किरकोळ ताप येत असेल तर लवंगांचा चहा प्यावा.

५. सर्दी-खोकला दूर होतो.

६.डोकेदुखीपासून आराम मिळतो.

 

लवंगांचा चहा कसा कराल?

४-५ लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा. त्यानंतर चहासाठी पाणी ठेवल्यावर त्यात १ लहान चमचा तयार लवंगांची पूड टाका. लवंगांची पूड टाकलेलं पाणी १० मिनीटं उकळवा व पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. अशा प्रकारे लवंगांचा चहा तयार. ( आवड असल्यास साखर घालावी.)