टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने तीन नवीन स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. एअरटेलचे हे तिन्ही प्लॅन 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत. या तिन्ही प्लॅनमध्ये युजर्सना डेटाशिवाय Zee5, Wynk Music आणि Airtel XStream या सेवाही मोफत वापरण्यास मिळतात.

एअरटेलने 99, 129 आणि 199 रुपयांचे तीन नवीन प्रीपेड प्लॅन आणलेत. 99 आणि 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 1GB डेटा वापरण्यास मिळतो. तर 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1GB डेटा मिळतो. व्होडाफोन कंपनीही काही शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना 199 रुपयांचा प्लॅनमध्ये दरोज 1GB डेटा आणि व्होडाफोन प्ले व Zee5 चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.

एअरटेलचे 99 आणि 129 रुपयांचे प्लॅन –
एअरटेलच्या 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि 100 SMS चाही लाभ मिळेल. 18 दिवस या प्लॅनची वैधता असेल. एअरटेलचा हा प्लॅन बिहार, झारखंड, कोलकाता, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. याशिवाय हा प्लॅन ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश (काही भाग) आणि पश्चिम बंगालमध्येही उपलब्ध आहे. एअरटेलचा दुसरा प्लॅन 129 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवा 99 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत. पण याची व्हॅलिडिटी 24 दिवस असून यात एकूण 300 SMS पाठवता येतात. 129 रुपयांचा हा प्लॅन आसाम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, नॉर्थ ईस्ट, ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश (काही भाग) , उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.

एअरटेलचा 199 रुपयांचा प्लॅन –
एअरटेलच्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1GB डेटा मिळतो. 24 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS चा लाभही मिळेल. हा प्लॅन आसम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा, केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, नॉर्थ ईस्ट, ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश (काही भाग), उत्तराखंडसह पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.