18 January 2018

News Flash

लख्ख प्रकाशामुळे कोमातून बाहेर येण्यास मदत

प्रकाशामुळे कोमातील रुग्णावर सकारात्मक परिणाम

पीटीआय, लंडन | Updated: April 21, 2017 1:30 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रात्री आणि दिवसा कोमात गेलेल्या रुग्णासमोर लख्ख प्रकाशयोजना केल्यास अशा रुग्णाच्या जाणिवा जागृत होण्यात मतद होते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

प्रकाशामुळे कोमातील रुग्णावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. शरीरात सर्कडियन ऱ्हिदम किंवा तालबद्ध भिन्नता दर्शविणाऱ्या पेशी असतात. या पेशींमुळे मानवास उत्तेजन मिळते. प्रकाशामुळे कोमातून बाहेर आलेल्यांची संख्या अधिक असल्याचे चाचण्यांद्वारे स्पष्ट झाले आहे, असे ऑस्ट्रियातील साल्झबर्ग विद्यापीठातील संशोधिका क्रिस्टिन ब्लुमे यांनी स्पष्ट केले.

सर्कडियन ऱ्हिदममुळे शरीरात एक प्रकारे घडय़ाळाची निर्मिती झालेली असते. त्यामुळेच झोप, झोपेतून उठणे, खाणे अशा गोष्टी मनुष्य करतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे हे घडय़ाळ शरीरातील तापमानावरही नियंत्रण ठेवते. सकाळच्या वेळेत शरीरातील तापमानात एक किंवा दोन अंश सेल्सिअसने घट झालेली असते, असे संशोधकांनी सांगितले. मेंदूवर आघात झालेल्या १८ रुग्णांचा संशोधकांनी अभ्यास केला. कोमात गेले असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नव्हती. त्यानंतर संशोधकांनी यांपैकी ८ रुग्णांना लख्ख प्रकाशात ठेवून त्यांचे संशोधन सुरू केले. त्यांपैकी दोन रुग्णांमध्ये सकारात्मक बदल झाला आणि त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाल्याचेही संशोधकांनी सांगितले आहे. हे संशोधन न्यूरोलॉजी मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

First Published on April 21, 2017 1:30 am

Web Title: bright lights may help wake coma patients
  1. No Comments.