Hero MotoCorp ने आपली लोकप्रिय बाइक Splendor Plus बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. यासोबतच कंपनीने Destini 125 आणि Maestro Edge 125 स्कुटर्सही बीएस-6 इंजिनमध्ये अपडेट केल्यात. बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत तिन्ही अपडेटेड बाइक्सच्या किंमतीत वाढ झाली आहे.

बीएस6 हीरो स्प्लेंडर स्टाइलच्या बाबतती जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे. पण, बाइक नवीन डेकल्स आणि नवीन ड्युअल-टोन कलरच्या पर्यायांमध्ये आली आहे. बाइकच्या इंस्ट्रुमेंट कन्सोलवर इंजिन चेक लाइट दिल्यात. बीएस-6 स्प्लेंडर प्लस ही बाइक अ‍ॅलॉय व्हिलसोबत किक, अ‍ॅलॉय व्हिलसोबत सेल्फ व i3S आणि अ‍ॅलॉय व्हिलसोबत सेल्फ अशा तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. स्प्लेंडर प्लसमध्ये एक्ससेन्स टेक्नॉलॉजी आणि फ्युअल-इंजेक्शनसोबत बीएस-6 कम्प्लायंट, 100cc, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8000 rpm वर 7.91 bhp ची ऊर्जा आणि 6000 rpm वर 8.05 Nm पीक टॉर्क निर्माण करते. बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 इंजिनमध्ये पावर थोडी कमी झालीये. बीएस-4 इंजिनची पावर 8.24 bhp आहे.

Viral Video Dolly Chaiwalla Visit Dubai And Enter Burj Khalifa On Top Flower To sips One Cup coffee
डॉली चहाविक्रेत्याची दुबई सफर; एक कप कॉफी अन् बुर्ज खलिफाची झलक, पाहा VIDEO
kitchen tips in marathi icecream stick in toilet cleaning tips
Kitchen Jugaad:आईस्क्रिम खाल्ल्यानंतर काठी टॉयलेटमध्ये टाका; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
Bigg Boss 16 winner MC Stan quits rapping
‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन रॅप सोडणार, सोशल मीडियावरून केली घोषणा
irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा

आणखी वाचा – (किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

आणखी वाचा – (Maruti चा धमाका, फक्त 11 हजारांत बुक करा नवीन Brezza)

आणखी वाचा – (स्वस्तात घ्या घर-दुकान! SBI कडून कर्जबुडव्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी)

किंमत –
बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत बीएस-6 स्प्लेंडरची किंमत 7,100 रुपयांनी वाढली आहे. तर, Maestro Edge 125 आणि Destini 125 या दोन स्कुटर्सच्या किंमतीत अनुक्रमे 8,280 रुपयांपर्यंत व 7,410 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. BS6 Hero Splendor Plus ची नवी किंमत 59,600 रुपये, Hero Destini 125 BS6 ची किंमत 64,310 रुपये आणि Maestro Edge 125 BS6 ची किंमत 67,950 रुपये ठेवण्यात आली आहे. या एक्स-शोरुम किंमती आहेत.

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)