टेलिकॉम कंपन्यांकडून रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एकाहून एक भन्नाट ऑफर्स आणल्या जात आहेत. आता बीएसएनएलने जिओच्या 198 रुपयांच्या प्लॅनला पर्याय म्हणून 171 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे.
बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनमध्ये युजर्सला एका महिन्यासाठी 60GB डेटा म्हणजेच दरदिवशी 2 GB 3G डेटा मिळेल. याशिवाय अमर्यादित व्हॉइस कॉल्सची सुविधाही मिळणार आहे. तसंच मोफत एसएमएसही करता येणार आहेत. सध्या बीएसएनएलचा हा प्लॅन केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येच उपलब्ध करण्यात आला आहे, मात्र लवकरच अन्य ठिकाणीही हा प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, रिलायंस जिओच्या 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 56 GB डेटा मिळतो. म्हणजेच जिओकडूनही दरदिवशी 2 GB डेटा वापरता येतो. तसंच अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दरदिवशी 100 एसएमएसची सेवाही पुरवली जाते. जिओचा हा प्लॅन देशभरात सर्वत्र उपलब्ध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 12:57 pm