सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या(BSNL) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बीएसएनएलने आपल्या ‘टॉकटाइम लोन’ सेवेची मर्यादा वाढवली आहे. आता बीएसएनएल आपल्या युजर्सना 50 रुपयांपर्यंत टॉकटाइम लोन देत आहे. आतापर्यंत कंपनी ग्राहकांना केवळ 10 रुपये लोन देत होती. काही कारणांमुळे आपला नंबर रिचार्ज न करु शकणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने ही सेवा आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी सर्व युजर्सना स्पेशल USSD Code डायल करावा लागेल.

बीएसएनएल प्रीपेड ग्राहकांना लोन घेण्यासाठी USSD code 5117# डायल करावा लागेल. यानंतर स्क्रीनवर एक मेसेज दिसेल, त्यामध्ये ग्राहकाला आवश्यक लोनची रक्कम निवडावी लागेल. आधी कंपनीकडून केवळ 10 रुपये क्रेडिट लोन दिलं जात होतं. पण आता कंपनीने यासाठी अजून चार पर्याय- 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये दिले आहेत. एकदा अमाउंटचा पर्याय निवडल्यानंतर लगेच ग्राहकांच्या अकाउंटमध्ये लोन क्रेडिट केले जाईल.

घेतलेल्या लोनचा परतावा ग्राहक कसा करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुढील रिचार्ज केल्यानंतर कंपनी लोनची रक्कम आपोआप युजरच्या अकाउंटमधून कापून घेईल अशी शक्यता आहे.