सरकारी टेलिकॉम कंपनी ‘बीएसएनएल’कडे अद्याप पूर्ण क्षमतेने 4G नेटवर्क उपलब्ध नाहीये, पण कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी 3G नेटवर्क्सचे अनेक प्लॅन्स आहेत. युजर्सना दररोज 3GB डेटा देणारे काही शानदार प्लॅन कंपनीकडे आहेत. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना 3GB डेटासोबतच फ्री कॉलिंगचाही फायदा मिळतो. बीएसएनएलचे दररोज 3 जीबी डेटा देणारे प्लॅन 78 रुपयांपासून सुरू होतात. सविस्तर जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत :-

बीएसएनएलकडे 78, 247, 997 आणि 1999 रुपयांचे चार जबरदस्त प्लॅन आहेत. 78 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना आठ दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटाशिवाय कॉलिंगसाठी रोज 250 मिनिटे मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये Eros Now चं मोफत सब्स्क्रिप्शनही देत आहे. पण, कंपनीचा हा प्लॅन काही सर्कलमध्येच उपलब्ध आहे. याशिवाय, बीएसएनएलकडे 36 दिवसांची वैधता असलेले 247 रुपयांचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर आहे. यामध्येही दररोज 3जीबी डेटासह कॉलिंगसाठी रोज 250 मिनिटे मिळतात. 3जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80 Kbps इतका होतो.

कंपनीकडे 997 रुपयांचा एक प्लॅन आहे. यामध्येही दररोज 3जीबी डेटा वापरण्यास मिळतो. पण पहिल्यांदा रिचार्ज करणाऱ्यांनाच ही ऑफर मिळते. फर्स्ट रिचार्ज कूपन म्हणून कंपनीने हे रिचार्ज आणलं आहे. अन्य प्लॅन्सप्रमाणे यामध्येही कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये दोन महिन्यांसाठी फ्री कॉलर ट्यून सेवाही ग्राहकांना मिळेल. या व्यतिरिक्त कंपनीचा 1999 रुपयांचा  प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज 100 फ्री एसएमएस, फ्री कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज म्हणजे वर्षभर दररोज 3GB डेटा ग्राहकांना मिळेल. दिवसाची डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80 Kbps इतका होतो.