मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार वॉर सुरु असून एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी या कंपन्या सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नुकताच आपला एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ७५ रुपयांचा असून त्याची वैधता १५ दिवसांची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री असणार हे. यासोबतच ५०० मोफत मेसेज तसेच १० जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सध्या फक्त मुंबई आणि दिल्लीतील बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी असणार आहे. लवकरच हा प्लॅन सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

बीएसएनल ग्राहक या प्लॅनची मुदत अतिरिक्त पैसे भरून वाढवू शकता. ही मुदत ९० किंवा १८० दिवसांपर्यंत होऊ शकते. मुदत वाढवण्यासाठी ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ९८ रूपयांच्या रिचार्जनंतर तुमची मुदत ९० दिवसांपर्यंत होऊ शकतो. प्रीपेट ग्रहकांना प्रथम ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ७५ रूपयांच्या प्लॅनसाठी पात्र ठरू शकतील.

बीएसएनएल ब्रॉडबँड प्लॅनमध्ये बदल

बीएसएनएल कंपनीच्या फायबर-टू-द-होम म्हणजेच एफटीटीएच या प्रकारातील ब्रॉडबँड सेवा लोकप्रिय झाली आहे. यात फायबर ऑप्टीकच्या माध्यमातून अतिशय प्रचंड गतीने इंटरनेट सेवेचा आनंद घेता येत असून याचे प्लॅनही किफायतशीर दरात सादर करण्यात आल आहेत. बीएसएनएल एफटीटीएच या सेवेच्या अंतर्गत आता डाऊनलोडचा वेग आणि एफयुपी म्हणजेच ‘फेयर युज पॉलिसी’च्या अंतर्गत लिमिटदेखील वाढविण्यात आलेली आहे. यामध्ये ३,९९९; ५,९९९; ९,९९९ आणि १६,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये संबंधीत बदल करण्यात आलेला आहे. यातील पहिल्या प्लॅनमध्ये ५० ऐवजी ६० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. हा वेग ५०० नव्हे तर ७५० जीबीपर्यंत मिळेल. ५,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १२५० एमबीपर्यंत ७० मेगाबाईट प्रति-सेकंद इतका वेग मिळरार आहे. ९,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये २२५० जीबीपर्यंत १०० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. तर १६,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल ३.५ टिबीपर्यंत १०० एमबीपीएसचा वेग मिळणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl rolls out rs 75 prepaid plan offers
First published on: 07-09-2018 at 10:45 IST