गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. मोठा सेल असला की लोक डिस्काउंट मिळतं, म्हणून बरीच खरेदीही ऑनलाइन करतात. लॉकडाउनमुळे मात्र अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कामं थांबली. त्यामुळे आता पैशाचा ओघही थांबला आहे. अशावेळी खरेदी करताना पैसे कमी पडत असतील तर ऑनलाइन शॉपिंगवेळी लोनचा नवा फंडा उपलब्ध झाला आहे. “खरेदी तर करा, पैशाचं नंतर बघू” (BNPL) या धर्तीवर आता ऑनलाइन शॉपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. रायटर्सने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

एकाने रे-बनचा गॉगल खरेदी करण्यासाठी निवडला खरा पण, त्याची किंमत पाहून चक्रावला. पण, त्यातच एक पर्यायही दिसला. तो होता ‘आफ्टरपे’चा. म्हणजेच, आता खरेदी करायचं आणि चार हप्त्यात ती रक्कम फेडायची. ‘आफ्टरपे’ ही कमी कालावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. ही कंपनी ऑनलाइन विक्री करणाऱ्यांसाठी लोन देते आणि विक्री करणाऱ्यांना त्यातून ४ ते ६ टक्के कमिशनही मिळते.

करोना विषाणूच्या महामारीमुळे अमेरिकासह अन्य देशांमध्ये डबघाईला आलेल्या विक्रीला “खरेदी तर करा, पैशे नंतर द्या” { buy-now-pay-later (BNPL) } या स्कीम अंतर्गत चालना मिळाली. परिणामी मंदीतही देशाच्या अर्थव्यवस्थेला ई-कॉमर्स साइटमुळे थोड्याफार प्रमाणात फायदा झाला आहे.

जगातील करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांनी ऑनलाइन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्यामध्ये ते गुंतवणूकही करत आहे. त्यामुळे भविष्यात “खरेदी तर करा, पैसे नंतर द्या” { buy-now-pay-later (BNPL) } या योजनेला आणखी मागणी येणार आहे. पण ग्राहकांची वाढती संख्येमुळे चुकीच्या पद्दतीनं कर्ज देण्याची आणि चुकतं न करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. तसेच वाढती बेरोजगारी आणि मंदीच्या काळात व्यावसायाच्या या नव्या मॉडेलची खरी परीक्षा असेल.