मॉलमध्ये फिरणे किती मजेशीर असते ना! त्यातून जर ते परदेशातले मॉल असतील तर बघायलाच नको. एका छताखाली बरच काही देणारी ही मॉल संस्कृती हळूहळू आपल्याकडेही रुजू होत चालली आहे. कपडे, खेळणी, खाद्यापदार्थांची दुकाने, मनोरंजनासाठी देखील अनेक कार्यक्रम इथे असतात, त्यामुळे शहरी लोकांना ही मॉल संस्कृती भारीच आवडू लागली आहे. खरेदी केली तर ठीक नाहीतर विंडो शॉपिंग किंवा निव्वळ टाईमपास तर होतोच ना!

वाचा : …कशी मिळवाल चांगली झोप!

वाचा : परीक्षांच्या सीझनमध्ये कोणता आहार घ्याल?

तुम्हाला आठवतंय मॉलच्या वेगवेगळ्या मजल्यांवर वर खाली करण्यासाठी लिफ्ट किंवा एस्कलेटर बसवण्यात आले तेव्हा अनेकांना किती कुतूहल होतं याबद्दल, पाय-या जाऊन लिफ्ट आल्या, लिफ्टनंतर सरकते जीने म्हणजे एस्कलेटरही आलेत, आता यापुढे लिफ्टमध्ये आणखी नवं काय पाहायला मिळेल याचे कुतूहल तुम्हाला असेल. मग हे पाहा चीनमधल्या एका मॉलमध्ये चक्क वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठी घसरगुंडीच बसवली आहे. ४६ मीटर लांब आणि १६ मीटर उंच अशी ही घसरगुंडी आहे. चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी तिचा वापर करण्यात येणार आहे. या घसरगुंडीमुळे फक्त १० सेंकदात माणूस अंतर कापू शकतो आहे की नाही मजेशीर !