05 April 2020

News Flash

Coronavirus लॉकडाउन : सर्व सेवा बंद करण्याची घोषणा, Flipkart चा मोठा निर्णय

"ही अत्यंत कठीण वेळ आहे..."

करोना व्हायरसमुळे देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनेही मोठा निर्णय घेतलाय. आपल्या सर्व सेवा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

फ्लिपकार्टची वेबसाइट ओपन केल्यानंतर याबाबत एक संदेश दिसतो. त्यामध्ये, “कंपनीकडून आम्ही आमच्या सर्व सेवा तात्पुरत्या बंद करत आहोत. ही अत्यंत कठीण वेळ आहे…पण, लवकरात लवकर परतण्याचा आमचा प्रयत्न असेल… लोकांना सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांपासून दूर राहावं लागेल असं यापूर्वी कधीही झालं नाही…तुम्ही घरातच राहा आणि सुरक्षित राहा…आम्ही लवकरच परत येवू…”,अशा आशयाचा संदेश कंपनीकडून देण्यात आला आहे.

याशिवाय, पेज स्क्रोल डाउन केल्यानंतर खाली COVID-19 बाबत घ्यावयाची खबरदारी, विमानतळांवर स्कॅन झालेल्या प्रवाशांची आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांची माहिती, हेल्पलाइन नंबरसह अन्य विविध महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पेजवर FAQs नावाचे सेक्शन असून यामध्ये तुम्ही करोना व्हायरसबाबतचे प्रश्न विचारु शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 11:49 am

Web Title: coronavirus lockdown flipkart temporarily suspends all services sas 89
Next Stories
1 COVID-19 : T20 World Cup जिंकवून देणारा क्रिकेटपटू बजावतोय पोलिसाचं कर्तव्य
2 Yamaha ची जबरदस्त Majesty S 155 स्कूटर , जाणून घ्या खासियत
3 Redmi ने आणला टेबिल टेनिसच्या बोर्डऐवढा Smart TV, वाचा किती आहे किंमत?
Just Now!
X