News Flash

नैराश्येच्या उपचारांचा हृदयाला धोका नाही

नैराश्य या मानसिक आजारावर करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे पक्षाघात, हृदयरोग येण्याचा धोका नाही.

नैराश्य या मानसिक आजारावर करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे पक्षाघात, हृदयरोग येण्याचा धोका नाही. या उपचारांमुळे रुग्णाला मृत्यू येण्याची शक्यताही कमी आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

अमेरिकेतील हृदयासंबंधी इंटरमाऊंटन मेडिकल सेंटरच्या हेदी मे यांच्या मते, सध्याचे संशोधन हे अचूक असून ज्याचे हृदय कमकुवत आहे, त्यांच्यावर निराशा घालविण्यासाठी करण्यात आलेल्या उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत, तर यापूर्वी केलेल्या संशोधनात निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना दीर्घकालीन अशा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजारांची संभाव्य शक्यता अधिक असून अल्पशा कालावधीपुरतीच असलेली निराशेची भावना ही संबंधित व्यक्तीतील हृदयासंबंधीचे आजार बळावण्याचा धोका कमी करताना निराशेवर मात करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी रुग्णाला उपयुक्त ठरत आहेत. तसेच संशोधनातील अंतिम निष्कर्षदेखील याकडेच निर्देशित करत असून निराशेची भावना घालविण्यासाठी तात्काळ प्रयत्न न केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची गुंतागुंतीमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे मत मे यांनी व्यक्त केले आहे.

संशोधनाच्या अंती अद्याप निराशेच्या गर्तेत नसलेल्या ४.६ टक्के रुग्णांमध्ये दिसून आलेली हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीची गुंतागुंत ही कधीही निराशेच्या भावनेत नसलेल्या (४.८) रुग्णांप्रमाणेच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे, तर संशोधनाच्या दरम्यान, जे निराशेच्या गर्तेत आहेत आणि जे जाणार आहेत त्यांच्यात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजाराची शक्यतेचे प्रमाण हे ६ आणि ६.४ टक्के असल्याचे आढळून आलेले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:08 am

Web Title: depression treatment is not affecting on heart
Next Stories
1 ऑक्सिटोसिनच्या मदतीने लठ्ठपणावर नियंत्रण शक्य
2 जैववैद्यकीय कचऱ्यांच्या विल्हेवाटीसाठी नवी नियमावली
3 आयुषच्या प्रसारासाठी केंद्र सरकारकडून विविध उपक्रम
Just Now!
X