News Flash

मधुमेह रुग्णांना आता भातसेवन वज्र्य नाही

जीआयचे प्रमाण कमी असणाऱ्या तांदळाच्या प्रजातीचा शोध

या वेळी संशोधकांना चकित करणारे अनेक निष्कर्ष समोर आले.

जीआयचे प्रमाण कमी असणाऱ्या तांदळाच्या प्रजातीचा शोध
मधुमेहाने पीडित असणाऱ्या रुग्णांच्या आहारात भात वज्र्य असतो, कारण भातातील ग्लाकेमिक इंडेक्सचे (जीआय) प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी शत्रूसारखे असते. पण छत्तीसगडमधील संशोधकांनी तांदळाची अशी प्रजाती शोधल्याचा दावा केला आहे, ज्याचा आहारातील वापर मधुमेह पीडितांच्या रक्तातील ग्लाकेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
संशोधकांच्या मते हा तांदूळ खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. केवळ मधुमेह रुग्णांसाठीच नव्हे, तर सर्वसाधारण लोकांच्या आरोग्यमय आहाराच्या दृष्टीनेही हा तांदूळ फायदेशीर आहे. पुढील महिन्यात तांदळाची ही नवीन प्रजाती व्यावसायिक स्वरूपात बाजारात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती या संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे आणि इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात आण्विक आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. गिरीश चांडेल यांनी दिली.
गेल्या कित्येक वर्षांपासून संशोधकांचे हे पथक मधुमेहग्रस्त रुग्णांना उपयुक्त ठरावे यासाठी जीआयचे प्रमाण कमी असलेल्या तांदळाच्या प्रजातीसाठी संशोधन करत आहेत.
या वेळी संशोधकांना चकित करणारे अनेक निष्कर्ष समोर आले. त्यात छत्तीससगडमधील पारंपारिक ‘चपटी गुरमाटिया’ तांदळाच्या प्रजातीमध्ये आवश्यक लक्षणे आढळून आल्याचे डॉ. चांडेल यांनी स्पष्ट केले.
या संशोधनात नोंदवण्यात आलेली निरीक्षणे निश्चितच देशातील मोठय़ा लोकसंख्येच्या आरोग्यमय आहारासाठी उपयुक्त असल्याचा दावा डॉ. चांडेल यांनी केला. त्यासाठी संशोधकांनी छत्तीसगडमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत उंदरांवर प्रायोगिक स्वरूपात संशोधन केले. त्यामधून संकलित झालेल्या माहितीच्या आधारावर जीआय तांदळाचे सेवन केलेल्या मधुमेहग्रस्त उंदराच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण आणि इन्शुलिन दिलेल्या दुसऱ्या मधुमेहग्रस्त उंदराच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 3:45 am

Web Title: diabetes patients dont eat rise
Next Stories
1 १,६८१ रुग्णांमागे केवळ एक डॉक्टर
2 अधिक निजे, त्याचेही आयुर्मान घटे!
3 कर्करोगावर उपायासाठी जेलचा यशस्वी वापर
Just Now!
X