कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. पंचांगकर्ते दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. यादिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे.

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो. पण पाडव्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील एखादी मोठी वस्तू किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. या दिवशी नातेवाईक किंवा मित्रमंडळी एकमेकांच्या घरी फराळाला आणि जेवायला जातात, यावेळी मिष्टान्न करण्याची पद्धत आहे. एकूणच पाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल