करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा आता सुरू झाला आहे. या टप्प्यात केंद्र सरकारनं काही क्षेत्रात सुट दिली आहे. चौथ्या टप्प्यात आता ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन, फ्लिपकार्टलाही सर्व सामानाची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसंच या निर्णयामुळे एमएसएमईना चालना मिळेल आणि आर्थिक चक्र सुरू होण्यासही बळ मिळणार असल्याचं कंपन्यांकडून सांगण्यात आलं.

सध्या निरनिराळ्या राज्यांद्वारे येणाऱ्या गाईडलाईन्सवर कोणत्या ठिकाणी सेवा सुरू ठेवायची आणि कुठे नाही हे ठरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली. पश्चिम, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आसाम या राज्यांनी आपल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. आतापर्यंत ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी होती. तसंच ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अन्य सामान पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता गृहमंत्रालय आणि काही राज्यांनी जारी केलेल्या आपल्या गाईडलाईन्सनुसार ई-कॉमर्स कंपन्यांना रेड झोनमध्येही सेवा पुरवता येणार आहेत. परंतु कन्टेंन्मेंट झोनमध्ये वस्तू पोहोचवण्याची परवानगी या कंपन्यांना नसेल.

nalasopara, tulinj police, Crack Down on Landlords, Renting to Foreign Nationals, Without Permission, Renting Foreigners Without Permission, nalasopara news, marathi news, police
परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणार्‍यांवर कारवाई, तुळींज पोलिसांनी २५ घर मालकांवर दाखल केले गुन्हे
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसारच काम

राज्यांनी लॉकडाउनच्या गाईडलाईन्स जारी केल्यानंतर सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसारच काम केलं जाणार असल्याची माहिती फ्लिपकार्टकडून देण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारनं राज्यांनाही अतिरिक्त अधिकार दिले आहेत. सध्या ई-कॉमर्स सेक्टरमध्ये अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा ८० टक्के हिस्सा आहे.

निर्णयाचं स्वागत

“रेड झोनमध्येही सर्व सामानाची विक्री करण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. या निर्णयामुळे आम्हाला रेड झोनमधील शहरांमध्येही सामानाची विक्री करण्यास मदत मिळणार आहे. तसंच आमचे जे वेअर हाऊस रेड झोनमध्ये आहेत त्यातूनही वस्तूंचा पुरवठा करण्यास मदत मिळणार आहे,” असं मत पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवार मोथे यांनी सांगितलं.