मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून त्यात आता आणखीन एक गोष्ट समोर आलीय ती म्हणजे नुकतेच तरुण वयात आलेल्या मुलांना देखील मधुमेह होत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या पाहता मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांच्या रोजच्या आहारात तसेच जीवनशैलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचं सेवन करत रहावे. ड्रायफ्रूट्स मधील बदाम हे मधुमेहासाठी चांगले फायदेशीर ठरू शकतात. बदामाच्या सेवनाने शरीरातील खराब (LDL)कोलेस्ट्रॉल कमी होणायास मदत होते, तर चांगले (HDL) कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाते. मधुमेहामुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारामध्ये बदल करणे गरजेचं आहे. चांगल्या आहाराचे सेवन केल्यामुळे मधुमेहासारखी समस्या दूर होण्यास मदत होते.

बदाम कसे मधुमेहासाठी फायदेशीर आहेत?

अनियंत्रित मधुमेहामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. पण मोजकेच ड्राय फ्रूट्स मधुमेहासाठी उपयुक्त ठरतात. त्यातील बदाम सर्वात फायदेशीर आहे. नेहमीच्या आहारामध्ये बदामाचा समावेश केल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

बदाम मधुमेहाचा धोका कसा कमी करतो?

मधुमेह असणार्यां नी रात्रभर बदाम पाण्यात भिजवून त्याचे सेवन ओट्सबरोबर किंवा नाश्त्याबरोबर करावे. बदामांमध्ये मॅग्नेशियम जास्त असल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट असल्याने ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी होते. तसेच मधुमेह असणार्याअ रुग्णांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो म्हणून त्या व्यक्तींनी दिवसभर निरोगी राहण्यासाठी बदामाचे सेवन करावे.
टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.