डॉ. राजेश्वरी पवार

घरातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. करिअर, संसार यात कायम गुंतवून घेणा-या महिला स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुढे जाऊन या महिलांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. खरंतर ४० नंतरचा काळ हा खास स्त्रियांच्या हक्काचा असतो. या काळात त्या स्वत:ला जास्त वेळ देऊ शकतात. परंतु, आयुष्यभर मेहनत केल्यामुळे ४० नंतर अनेक महिलांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित झाली की स्त्रियांनी गुडघेदुखी, पाठदुखी यासारख्या समस्या भेडसावतात. परंतु, याकडे दुर्लक्ष न करता त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. तसंच या काळात महिलांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे पाहुयात

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

१. संतुलित आहाराचं सेवन करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा, धान्य, कडधान्य यांचा आहारात समावेश करा.

२. मसालेदार पदार्थ, तेलकट, जंकफूड, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळा. मध्यपान तसेच धुम्रपान करु नका.

३. दररोज व्यायाम करावा. झुम्बा करणे, चालणे, एरोबिक्स, पोहणे, जॉगिंग असे व्यायाम प्रकारातील कोणताही आवडीचा व्यायाम करावा.

४. तणावमुक्त रहा. कामाचा तणाव, कुटुंब आणि इतर जबाबदा-या हाताळण्यामुळे ताणतणावाचा त्रास होऊ शकतो. एकाच वेळी इतर काम केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.

५.योगाभ्यास आणि ध्यान यासारख्या तणामुक्त करणा-या सवयी लावून घेणे फायदेशीर ठरेल.

६. ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यानी यापेक्षा उशीर करू नका. त्याकरिता आधी योजना आखा काही वेळेस आयव्हीएफसारख्या प्रक्रियेचादेखील आधार घ्यावा लागू शकतो.

७. आपल्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करू नका. आपण जरी संतुलित आहाराचे सेवन करत असाल आणि नियमित व्यायाम करत असाल तरी देखील नियमित आरोग्य चाचणी करणे आवश्यक आहे.

८. वेळोवेळी आपला रक्तदाब, थायरॉईड, रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासून पहा.

९. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि लवकर निदान करण्यासाठी तपासणी करणे आवश्य आहे.

१०. महिलांनी नेत्र तपासणी, त्वचेची तपासणी, दंत तपासणी, मॅमोग्राम आणि पॅप स्मीयर चाचणी करून घ्यावी.

११. आपली हाडे आणि स्नायू मजबूत ठेवा. ऑस्टियोपेनिया (हाडे कमकुवत होणे परंतु तरीही सामान्य मर्यादेच्या आत) आणि ऑस्टियोपोरोसिसने

(पॅथॉलॉजिकल पातळीवरील हाडांची शक्ती कमी होणे) ग्रस्त असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चाळीस नंतर नियमितपणे कॅल्शियम घेणे आवश्यक आहे.

१२. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असलेल्या आहाराचे सेवन करा. वजनावर नियंत्रण ठेवा.

( लेखिका डॉ. राजेश्वरी पवार या मदरहुड हॉस्पिटल खराडी, पुणे येथे या सल्लागार प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)