फेसबुक ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया नेटवर्किंग साईट आहे. पण असं असले तरी फेसबुकवर सर्वात जास्त वेळ ऑनलाइन असण्याचा युजर्सचा कालावधी घटला असल्याचं फेसबुकनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. लोक फेसबुकवर आता पुर्वी सारखे जास्त वेळ व्यतीत करत नसल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.

हा वेळ घटण्याचं कारण न्यूज फिडमध्ये फेसबुकनं केलेला बदल असू शकतो असंही सांगण्यात येत आहे. या नव्या बदल्यामुळे फेसबुकवर आता कमीत कमी व्हायरल व्हिडिओ दाखवण्यात येत आहे. फेसबुकवर जास्त वेळ व्यतीत करणाऱ्यांची संख्या घटली असली तरी फेसबुकवर मात्र याचा फारसा परिणाम होत नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवर पूर्वी जास्तीत जास्त वेळ घालवून ‘टाईमपास’ करणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी दरदिवशी लाखो लोक फेसबुकद्वारे एकमेकांशी जोडले जात असेही फेसबुकनं आपल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
फेसबुकचा मुळ उद्देश हा लोकांना एकमेकांशी जोडणं आहे, त्यामुळे फेसबुक वापरणं युजर्सना अधिक सुलभ व्हावं यावर आम्ही पुढच्या काळात लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मार्क झकरबर्गनं एका मुलाखतीत सांगितलं.