वंशाचा दिवा म्हणून मुलगाच झाला पाहिजे अशी विचारसरणी असणाऱ्या भारतीयांची आजही देशामध्ये कमी नाही. असं असलं तरी २१ व्या शतकामध्ये मुलगा, मुलगी असा भेदभाव करण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. खास करुन शहरी भागांमध्ये हा बदल प्रामुख्याने दिसून येत आहे. असं असतानाच आता मुली असणाऱ्या पालकांचे आयु्ष्यमान हे अधिक असतं हे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये सिद्ध झालं आहे. मुलगी असणारे पालक हे मुलगा असणाऱ्या पालकांपेक्षा दीर्घायुषी असतात असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

पोलंडमधील जैगीलोनियन युनिव्हर्सिटीमधील अभ्यासकांनी मुलीमुळे तिच्या वडिलांच्या आयुष्यमानावर काय परिणाम होतो या विषयावर संशोधन केले आहे. सामान्यपणे मुलांचा जन्म म्हटल्यावर आईचा विचार डोक्यात सर्वात आधी येतो. मात्र या अभ्यासामध्ये मुलगी झाल्यानंतर या मुलीमुळे वडिलांच्या आरोग्यावर आणि शरिरावर कसा परिणाम होतो याबद्दल संशोधन करण्यात आलं आहे. या अभ्यासादरम्यान चार हजार ३१० जणांची माहिती गोळा करण्यात आली. संशोधनामध्ये दोन हजार १४७ स्रियांनी आणि दोन हजार १६३ पुरुषांनी सहभाग घेतला. आई आणि वडील असणाऱ्या या सहभागी व्यक्तींनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावरुनच माहिती गोळा करुन संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे.

nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

काय अढळून आलं

या संशोधनामध्ये मुलगा असणाऱ्या वडिलांच्या आरोग्यावर संततीप्राप्तीनंतर काहीच परिणाम होत नसल्याचं अढळून आलं. मात्र दुसरीकडे मुली असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान हे अधिक असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. इतकचं नाही जास्त मुली असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान हे जास्त असते असंही या अभ्यासकांना दिसून आलं आहे. प्रत्येक मुलीमुळे तिच्या वडिलांचे आयुष्य ७४ आठवड्यांनी म्हणजेच दीड वर्षांनी वाढते असं संशोधकांनी म्हटलं आहे.

इतर संशोधक म्हणतात संतती असणारे दीर्घायुषी

एकीकडे वडिलांच्या आरोग्यावर मुलींच्या सहवासामुळे सकारात्मक परिणाम होत असतानाच दुसरीकडे आईसाठी मात्र ही फारशी चांगली गोष्टी नसते असं ‘अमेरिकन जनरल ऑफ ह्युमन बायोलॉजी’ या नियतकालिकेत छापून आलेल्या अभ्यासात म्हटलं आहे. संतती असणाऱ्या महिलांचे आयुष्य हे कमी असते अस या अभ्यासामध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका अभ्यासामध्ये एकट्या राहणाऱ्या स्रिया या दीर्घायुषी असतात असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. पोलंडमधील संशोधकांनी मुलगी असणे पुरुषांसाठी चांगले असल्याचं म्हटलं आहे तरी काही संशोधनांमध्ये या उलट निष्कर्ष समोर आले आहेत. संतती असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यमान हे संतती नसणाऱ्यांपेक्षा अधिक असतं असं अभ्यासामधून समोर आलं आहे. या अभ्यासासाठी १४ वर्षांहून अधिक काळ माहिती गोळा करण्यात आली. संतती असणारे दांपत्य हे संतती नसणाऱ्या दांपत्यांपेक्षा अधिक जगतात असं संशोधकांनी म्हटलं होतं.