News Flash

Jio phone 2 चा आज पुन्हा फ्लॅश सेल, किंमत 2 हजार 999

दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरुवात

रिलायंस जिओचा Jio phone 2 हा फीचर फोन आज पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता Jio.com या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणाऱ्या या सेलमध्ये Jio phone 2 अवघ्या 2 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फ्लॅशसेल असल्यामुळे मर्यादीत फोनचीच विक्री होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्याला फोनसाठी प्राधान्य दिलं जाईल.

Qwerty कीपॅड, यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:17 am

Web Title: flash sale reliance jio phone 2
Next Stories
1 समारंभासाठी सजताना अशी करा दागिन्यांची निवड
2 फॅशनेबल झिप्स
3 Health गॅसेस ही अनेकांची डोकेदुखी
Just Now!
X