Flipkart Wholesale ने सोमवारी पहिल्या Festival Month Fashion Sale ची घोषणा केली. ‘फ्लिपकार्ट होलसेल’ हा Flipkart समूहाचा डिजिटल B2B प्लॅटफॉर्म आहे. ऑगस्ट महिन्यापासून या प्लॅटफॉर्मची सुरूवात झाली असून पहिलाच Big Fesitval Month सेल आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार म्हणजे आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जवळपास महिनाभर हा सेल सुरू असणार आहे.

या सेलमध्ये 50 पेक्षा जास्त फॅशन ब्रँडचे प्रोडक्ट्स उपलब्ध असतील, तसेच 100 पेक्षा अधिक विक्रेता आणि 1 लाखापेक्षा जास्त सदस्य या सेलमध्ये सहभागी होतील. या एका महिन्याच्या सेलमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त लोकल प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. Big Festival Month सेलमध्ये फॅशन कॅटेगरीत मेन्स वेअर, वुमेन्स वेस्टर्न वेअर, वुमेन्स एथनिक वेअर, किड्स वेअर आणि फुटवेअर यांसारख्या श्रेणीत आकर्षक ऑफर्स आहेत.

Anant ambani radhika merchant wedding in july in london says report
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाचा भव्य मंडप ‘या’ ठिकाणी सजणार; ‘हे’ बॉलीवूड कलाकार लावणार हजेरी
Bigg Boss OTT 3 not happening this year Colors TV and Jio Cinema are not planning to bring a season 3
यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण
jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule lovestory
‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?
Salman Khan Show bigg boss ott 3 premiere date will be next month on may 15
Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ची वाट पाहताय, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो

फ्लिपकार्ट होलसेलचा व्यवसाय 15 शहरांमध्ये सुरू झाला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे किराणा आणि एमएसएमईला लाभ होईल असा कंपनीचा दावा आहे. गेल्या वर्षी कंपनीने Flipkart Wholesale या प्लॅटफॉर्मची घोषणा केली होती. “आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता रीटेल आणि एमएसएमई व्यावसायिकांसाठी हा सेल म्हणजे एक शानदार संधी आहे. आम्हाला त्यांची मदत करायची आहे. देशातील किराणा रिटेल इकोसिस्टमला यामुळे बळ मिळेल”, असं फ्लिपकार्ट होलसेल आणि वॉलमार्ट इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रमुख आदर्श मेनन यांनी या सेलबाबत माहिती देताना सांगितलं.