त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी केवळ सौंदर्यप्रसाधने वापरणे उपयोगी ठरत नाहीत. तर, त्यासाठी तुम्हाला चांगल्या आणि संतुलित आहाराचीही गरज असते. जेवणात टोमॅटोचा समावेश केल्यास त्वचेचा रंग उजळतो. संशोधकांच्या मते, जे लोक सलग तीन महिने दररोज जेवणात तीन चमचे टोमॅटोची पेस्ट समाविष्ट करतात ते लोक ऊन आणि इतर त्वचाविकारांपासून तुलनात्मकदृष्ट्या २५ टक्के सुरक्षित राहतात. तसेच सॅलडमध्ये दररोज टोमॅटोचा समावेश केल्यास अँटिऑक्सिडंट्सची पूर्तता होते आणि वाढत्या वयातील परिणाम कमी होण्यासही मदत मिळते, असे एका संशोधनात आढळले.
दररोज पत्ताकोबीच्या केवळ सहा पानांचे सेवन केल्यास ‘अ’ जीवनसत्त्वाची १०० टक्के पूर्तता होते. तसेच त्वचेचा रंगही उजळतो. यातील खनिजे आणि पोटॅशियममुळे त्वचा उजळते आणि रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. दररोज पत्ताकोबीच्या केवळ सहा पानांचे सेवन केल्यास ‘अ’ जीवनसत्त्वाची १०० टक्के पूर्तता होते. तसेच त्वचेचा रंगही उजळतो. यातील खनिजे आणि पोटॅशियममुळे त्वचा उजळते आणि रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो.
अंडयांमध्ये ल्युटेन आणि जियेक्जांथिन नावाचे दोन अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे अतिनील किरणांपासून बचाव होतो. त्वचेवर पडणारे डाग, सुरकुत्या आणि कर्करोगाची शक्यता कमी होते. हे अँटिऑक्सिडंट्स त्वचेची कोमलता कायम राखतात. बदामाचे नियमित सेवन केल्यास ‘ई’ जीवनसत्त्वाच्या पातळीत वाढ होते. बदाम हा त्वचेसाठी असलेला महत्त्वाचा अँटिऑक्सिडंट आहे. बदामामुळे त्वचेचा रुक्षपणा दूर होईल आणि उजळपणा कायम राहील.