01 October 2020

News Flash

Ganapati Utsav 2019 : घरच्या घरी तयार करा चॉकलेटचे मोदक

चॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट.

काही सण आणि पदार्थ यांचं नातं अतूट असतं. होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू तसं गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपतीबाप्पांच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांच्या डोळ्यांसमोर २१मोदकांचं ताट तरळू लागतं. गणेश चतुर्थी, संकष्टी, विनायकी, एकादशीनिमित्ताने मोदक हवेतच. बाप्पा आणि त्याचे प्रिय मोदक यांचं नातं पक्कं आहे.

चॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट. दिवसातील कोणत्याही वेळी चॉकलेट समोर आले तरीही आपण त्याला नाही म्हणून शकत नाही. काळाप्रमाणे याच चॉकलेटमध्ये बरेच बदल झाले. गणपतीच्या दिवसांत बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारातही हे चॉलेट मोदक मिळू लागले आहेत. मात्र या विकतच्या मोदकांची किंमत जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात घ्यायचे असल्यास परवडत नाहीत. अशावेळी घरच्या घरी हे चॉकलेट मोदक करता आले तर? पाहूयात चॉकलेट मोदकांची सोपी आणि चटकन करता येईल अशी रेसिपी

साहित्य :
पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला)
पाव कप पिठीसाखर
दीड ते दोन चमचे कोको पावडर

कृती :
कोरडय़ा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर एकत्र करून घ्या. एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला. एकत्र करा. परत एकदा एक चमचा कोको पावडर घाला. मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवर कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 12:38 pm

Web Title: ganapati utsav 2019 ganpati special chocolate modak recipe nck 90
Next Stories
1 Ganapati Utsav 2019 : जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व
2 फ्रान्समध्ये नरेंद्र मोदींसमोर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
3 ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’साठी प्रवेश अर्जाचे वितरण सुरू
Just Now!
X