Gemopai Electric कंपनीने एक नवी ई-स्कूटर लाँच केली आहे. Gemopai Astrid Lite असं या स्कूटरचं नाव असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 75 ते 90 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकते असा कंपनीचा दावा आहे. अतिरिक्त बॅटरी जोडण्याचा पर्याय देखील या स्कूटरमध्ये आहे. परिणामी, स्कूटरची रेंज वाढून 150 ते 180 किमीपर्यंत होईल असं कंपनीने म्हटलं आहे. 65 किमी इतका या स्कूटरचा टॉप स्पीड आहे.

या नव्या ई-स्कूटरमध्ये 2,400 W क्षमतेच्या ईलेक्ट्रिक मोटार आणि 1.7 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. रायडिंगसाठी या ई-स्कूटरमध्ये सिटी, स्पोर्ट आणि इकॉनॉमी असे तीन पर्याय आहेत. कलर एलईडी डिस्प्ले, एलईडी लाइट्स, की-लेस स्टार्ट आणि युएसबी पोर्ट यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत. या ई-स्कूटरच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आलेत. सुरक्षिततेसाठी यामध्ये साइड स्टँड सेंसर, अँटी थेफ्ट सेंसर आणि इलेक्ट्रिक असिस्ट ब्रेक सिस्टिम (EABS) हे फीचर्स आहेत.

बुकिंग आणि डिलिव्हरी –
नियोन, डीप इंडिगो, फिअरी रेड, चारकोल आणि फायरबॉल ऑरेंज अशा पाच कलर्सता पर्याय या स्कूटरसाठी आहे. पाच हजार रुपयांमध्ये या स्कूटरसाठी नोंदणीला सुरूवात झालीये. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून गाडीची डिलीव्हरी सुरू होईल. नेपाळमध्येही या स्कूटरची विक्री होणार असून कंपनीच्या भारत आणि नेपाळमध्ये 50 हून अधिक डिलरशिप आहेत. 79 हजार 999 रुपये इतकी या स्कूटरची किंमत आहे.