इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. यासोबतच ‘जीमेल’ही हल्ली सर्व वयोगटातील लोक वापरतात. ऑफीसच्या कामासाठी किंवा इतरही अनेक महत्त्वाच्या कामासाठी जीमेलचा वापर केला जातो. एकमेकांना मेल पाठवणे, काही महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करुन ठेवण्यासाठी अथवा एकमेकांशी संवाद करण्यासाठी जीमेलचाच भाग असलेल्या ‘हँगआऊट’चा वापर करतात. मात्र जीमेलमध्ये अशी काही फिचर्स आहेत जी आपल्या अतिशय उपयोगाची ठरु शकतात. अनेकांना ही फिचर्स माहिती नसतात. पाहूयात काय आहेत ही अनोखी फिचर्स….

अनसेंड मेसेजेस – या फिचरच्या माध्यमातून ‘सेंड मेल’ ‘अनसेंड’ करता येतो. मात्र या फिचरसाठी तुम्हाला एक सेटींग करावे लागेल. जीमेलच्या सेटींगमध्ये जाऊन अनडू सेंड हा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्ही ५ सेकंदांपासून ३० सेकंदांपर्यंतची वेळ निवडू शकता. म्हणजे मेल पाठविल्यानंतर केवळ ३० सेकंदांमध्ये तुम्हाला अनडू सेंड या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. विशेष म्हणजे हा मेल डिलीट होणार नाही.

कलरफूल स्टार्स – जीमेलमध्ये आपण आलेल्या काही मेलला स्टार करु शकतो. यासाठी आपण ‘कलरफूल स्टार्स’ वापरु शकतो. यामध्ये जीमेलच्या सेटींगमध्ये जाऊन थोडे खाली स्क्रोल करावे. खाली स्टारचा पर्याय उपलब्ध असतो. याठिकाणी आपण पिवळा, लाल, हिरवा, केशरी आणि जांभळा असे रंग उपलब्ध आहेत.

सर्च प्रॉपरली – आपल्याला अनेकदा जुना एखादा मेल हवा असतो. आपण त्यातील काही महत्त्वाचे शब्द किंवा ज्यांनी मेल पाठवलाय त्याच्या नावाने ते सर्चही करतो. पण काहीवेळा आपल्याला हवा तो मेल मिळत नाही. यासाठी जीमेलमध्ये एक खास सुविधा उपलब्ध आहे. नेमका शब्द सर्च केल्यावर तुम्हाला हवे ते मेल सहज सापडतात.

नको असलेल्या लोकांना ब्लॉक करा – व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर ज्याप्रमाणे आपल्याला नको असलेल्या लोकांना ब्लॉक करता येते. त्याचप्रमाणे आपण जीमेलवरही आपल्याला नको असलेल्या लोकांना ब्लॉक करु शकतो. यासाठी विशिष्ट व्यक्तीच्या मेलवर गेल्यास त्यावर उजव्या बाजूला वरती रिप्लायची खूण असते. त्याच्याबाजूला असणाऱ्या सेटींग्जमध्ये जाऊन आपण त्या व्यक्तीला ब्लॉक करु शकतो.