गुगल आपल्या युजर्सचा डेटा गोपनीय ठेवण्यासाठी नवनवीन फिचर घेऊन येत असतो. आता गुगलने आणखी एक नवीन फिचर आणले आहे. या फिचरचे नाव Confidential Mode असे आहे. या फिचरमधील ‘पासकोड’ वापरून मेल सुरक्षितरित्या पाठवता येतो. तसेच ई-मेलचा अनधिकृत वापर या फिचरद्वारे थांबवता येऊ शकतो. कॉन्फिडेंशल मोड ई-मेल पाठवण्यापूर्वी गुगलकडून एक पासकोड जनरेट केला जातो.

जीमेलचे हे नवे फिचर संगणक, लॅपटॉप, अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये देखील वापरले जाऊ शकते. या फिचरद्वारे जीमेल खाते आणखी सुरक्षित करता येते. ते कसे जाणून घेऊयात…

* http://www.gmail.com या वेबसाइटवर क्लिक करा किंवा फोनमधील जीमेल अॅप उघडा

* लॉग इन माहिती टाकून जीमेल ओपन करा

* त्यानंतर कंपोज बटणारवर क्लिक करा. स्मार्टफोनमध्ये कंपोज करण्यासाठी ‘+’ वर क्लिक करा

* ज्याला ई-मेल करायचा त्याचा ई-मेल आयडी टाका आणि संदेश लिहा

* त्यानंत सेन्ड बटणाच्या बाजूला घड्याळाचे चिन्ह दिसेल. तसेच फोनमध्ये डाव्या बाजूला तीन टिंब दिसतील. त्यावर क्लिक केल्यावर कॉनफिडेंशल मोड पर्याय दिसेल

* घड्याळावर क्लिक केल्यावर ‘कन्फर्म बाय पासकोड’ हा पर्याय निवडावा. फोनमध्ये कॉनफिडेंशल मोडमधील सेटिंग बदला आणि सेव करा

* त्यानंतर एक्सपायरेशन टाइम सिलेक्ट करा

* तिथे ज्याला तुम्ही संदेश पाठवू इच्छिता त्यांचा मोबाइल नंबर टाका.

* त्यानंतर रिसीपिअंटला एक मेल मिळेल. त्यामध्ये तो पासकोड टाकावा लागेल. हा पासकोड मेसेजद्वारे प्राप्त होईल.

* असे केल्यानंतर मेसेज अनलॉक होईल

* या व्यतिरिक्त युजर्स ‘No SMS passcode’ हा पर्याय निवडू मेसेज एनस्क्रिप्ट करु शकतात.

कॉन्फिडेंशल मोडद्वारे पाठवण्यात आलेल्या ई-मेलची प्रिंट, कॉपी, डाऊनलोड किंवा फॉरवर्ड केला जाऊ शकत नाही.