गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात बॅन केल्यापासून लोकप्रिय ऑनलाइन लॉयल बॅटल गेम PUBG मोबाइलच्या पुनरागमनाबाबत सतत निरनिराळ्या बातम्या येत आहेत. गेल्या आठवड्यात कंपनीने गेमच्या रिलाँचींगबाबत ट्रेलरही प्रदर्शित केला होता, पण नंतर कंपनीने तो व्हिडिओ डिलिट केला. अशातच आता हा गेम भारतामध्ये नवीन नावान लाँच होणार असल्याचं वृत्त आलं आहे.

जेमवायर(Gemwire)च्या रिपोर्टनुसार, PUBG मोबाइल गेमच्या इंडियन व्हर्जनचं नाव आणि पोस्टर समोर आलं आहे. कंपनी हा गेम भारतात नवीन नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. यानुसार, PUBG कॉर्पोरेशन भारतात बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया नावाने पबजी गेम लाँच करेल.

७ एप्रिल रोजी PUBG मोबाइलची पॅरेंट कंपनी Krafton ने भारतात एक नवीन वेबसाइट डोमेन http://www.battlegroundsmobileindia.in रजिस्टर केलं असल्याचा दावाही जेमवायरकडून करण्यात आला आहे. पण नेमका हा गेम भारतात केव्हा लाँच होईल याची तारीख सांगण्यात आलेली नाही. मात्र या वर्षीच्या मध्यापर्यंत हा गेम अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्म्ससाठी रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. लडाखमध्ये चीनसोबत उद्भवलेल्या संघर्षानंतर भारत सरकारने पबजीसह शेकडो चिनी अॅप्स बंद केले आहेत.