मानवी भावभावना जाणणारे सॉफ्टवेअर जर्मन शास्त्रज्ञाने गुगल ग्लाससाठी विकसित केले आहे. चेहऱ्यावरील भाव टिपून हे सॉफ्टवेअर भावना उघड करणार आहे. याशिवाय व्यक्तीचे वय आणि पुरुष आहे की स्त्री याची नोंदही या माध्यमातून ठेवता येणार आहे.
फ्रॉनहोफेर संस्थेतील संशोधकांनी ‘शोअर’ हे रिअल टाइम सॉफ्टवेअर तयार केले आहे. गुगल ग्लासबरोबर हे सॉफ्टवेअर वापरात आणले जाईल. चेहऱ्यावरील भाव जाणून त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता त्यात असेल. अशा प्रकारचे हे पहिलेच अॅप्लिकेशन असेल. ग्लासच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या एकात्मिक कॅमेऱ्यात ‘शोअर’ हे अॅप्लिकेशन व्यक्तीच्या चेहऱ्याची नोंद करील. या वेळी त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, याचा शोध घेणेही त्याला सहजशक्य होणार आहे. अर्थात चेहऱ्यावरील हावभाव हे त्यासाठी प्रमुख आधार असतील. याच वेळी व्यक्तीचे वय आणि तो पुरुष आहे की स्त्री आहे, याची नोंदही ‘ग्लासवेअर’ ठेवेल; परंतु ते त्या व्यक्तीची ओळख मात्र निश्चित करू शकणार नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले. हे सर्व आडाखे बांधताना एकात्मिक प्रक्रिया सुरू असेल. ‘रिअल टाइम’मध्ये या सर्व प्रक्रिया पार पडतील. चष्म्याप्रमाणे हे सॉफ्टवेअर वापरता येईल.
ऑटिझमसारख्या व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना याचा फायदा होईल, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. ज्यांना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून त्यावर व्यक्त होताना अडचणी निर्माण होतात, अशा लोकांसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे. डाटा ग्लाससह व्यक्तीच्या दृष्टिपटलावर नजरेतून सुटलेली एखादी माहिती आपोआप उमटेल आणि साठवली जाईल. याचा फायदा अंध व्यक्तींनाही होण्याची शक्यता आहे. त्यांच्याभोवती घडणाऱ्या अनेक घटनांची नोंद यात होत राहील. त्यासाठी पूरक चित्र त्याच्यावर उमटले जाईल आणि त्यातून ती अंध व्यक्ती परिस्थितीचा अंदाज बांधू शकेल, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2014 रोजी प्रकाशित
मानवी भावना जाणणारे सॉफ्टवेअर
मानवी भावभावना जाणणारे सॉफ्टवेअर जर्मन शास्त्रज्ञाने गुगल ग्लाससाठी विकसित केले आहे.
First published on: 01-09-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google glass app detects human emotions in real time