दिग्गज टेक कंपनी गुगल आज(दि.15) आपले Google Pixel 4 आणि Pixel 4 XL हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या दोन फोनद्वारे नुकत्याच लाँच झालेल्या अ‍ॅपलच्या नव्या आयफोनला तगडी टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. यासाठी गुगलकडून न्यू-यॉर्कमध्ये आज(दि.15) एका विशेष इव्हेंटचं आयोजन करण्यात आलंय. या इव्हेंटमध्ये गुगल Home Mini, नवीन Nest Wi-Fi आणि Pixelbook Go देखील लाँच करण्याची शक्यता आहे.

या फोनची अनेक वैशिष्ट्ये असून सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा फोन मोशन सेन्स या तंत्रज्ञानासह येत असल्याची चर्चा आहे. यासाठी ‘गुगल पिक्सेल 4’ मध्ये काही विशिष्ठ सेन्सरही देण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं फोनला हात लावायची गरज नसणार आहे. फोनला हात न लावताही केवळ तुमच्या हावभावावरून स्मार्टफोन ऑपरेट करता येणार आहे. नव्या पिक्सल मालिकेत यावेळी Motion Gestures यासारखे नवे फीचर आणि पुढील व मागील दोन्ही बाजूंना ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. Pixel 4 स्मार्टफोनमध्ये ट्रेडिशनल बेजल्स, 90Hz डिस्प्ले आणि स्क्वेअर शेप ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल. न्यू-यॉर्कमध्ये सकाळी 10 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसातच्या सुमारास या इव्हेंटला सुरुवात होईल. MadeByGoogle या युट्यूब चॅनलवरुन हा इव्हेंट लाइव्ह पाहता येणार आहे.

Pixel 4 मालिकेतील स्मार्टफोन ‘मेबी पिंक, स्काय ब्ल्यू, रिअली येलो, स्लाइटली ग्रीन, क्लिअरली व्हाइट, जस्ट ब्लॅक आणि ओह सो ऑरेंज’ अशा विविध रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध असतील. Pixel 4 मध्ये 5.7 इंच OLED FHD+ डिस्प्ले आणि Pixel 4 XL मध्ये 6.3 इंच OLED QHD+ पॅनल असण्याची शक्यता आहे. वनप्लसप्रमाणे या दोन्ही स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये दोन्ही स्मार्टफोन लाँच केले जातील.

आणखी वाचा- व्होडाफोनचा 69 रुपयांचा नवा प्लॅन, मोफत कॉलिंग आणि इंटरनेट डेटा

किंमत किती :-
Pixel 4 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 1049.95 कॅनडा डॉलर (जवळपास 56 हजार रुपये) आणि Pixel 4 XL च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 1,199.95 कॅनडा डॉलर (जवळपास 64 हजार रुपये) असू शकते.