सायकेडेलिक औषधे किंवा हॅलुसिनोजेन्स (भ्रम उत्पन्न करणारी औषधे) मानसोपचारांसाठी उपयोगी असल्याचे नव्या संशोधनातून दिसून आले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केले आहे.

अमेरिकेत १९४० च्या दशकात सायकेडेलिक औषधांवर किंवा हॅलुसिनोजेन्सवर बरेच संशोधन होत होते. ही गुंगी आणणारी किंवा भ्रम उत्पन्न करणारी द्रव्ये आहेत. त्यात एलएसडी, सायलोसायबीन आदी द्रव्यांचा समावेश होतो. त्यांचा वापर अनेकदा संगीत समारंभाला जाणाऱ्या व्यक्ती किंवा अन्य लोकांकडून तंद्री लावण्यासाठी अमली पदार्थासारखा केला जातो. त्यामुळे १९६० च्या दशकात अमेरिकेत त्यांच्या वापरावर बंदी आली.

student using mobile
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूला ब्लू व्हेल चॅलेंज कारणीभूत?
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

मात्र अलीकडेच झालेल्या ताज्या संशोधनानुसार ही द्रव्ये मनोविकारांवर उपचार करण्यास उपयोगी ठरू शकतात, असे सिद्ध झाले आहे. लॉरेन्शियन विद्यापीठाचे संशोधक अदील लाफ्रान्स यांच्या मते विविध संस्कृतींमध्ये गुंगीच्या औषधांचा वापर आध्यात्मिक कारणांसाठी केला जात असे. समाजातील कोलाहल आणि अस्वस्थतेपासून दूर जाऊन मन शांत करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे; पण हीच औषधे मनोरुग्णांना सामाजिक तणाव आणि अस्वस्थतेचा सामना करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. लॉस एंजेलिस बायोमेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या संशोधिका अ‍ॅलिशिया डॅनफर्थ यांनीही हाच दृष्टिकोन मांडला. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्षही त्याला पुष्टी देणारे आहेत. यामुळे अमेरिकेच्या औषधविषयक धोरणात बदल होत आहे. एमडीएमए किंवा सामान्यपणे एक्स्टासी नावाने ओळखल्या जाणाऱ्या औषधाचा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरच्या उपचारांसाठी वापर करण्याबाबत तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांना अमेरिकी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने परवानगी दिली आहे, असे अ‍ॅलियंट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संशोधक अ‍ॅडॅम स्नायडर यांनी सांगितले.